S M L

फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर (भाग - 2)

फूड टेक्नॉलॉजीतलं करिअरचा दुसरा भाग - फूड टेक्नॉलॉजीमधल्या रिसर्चचे एरियाज कोणते आहेत ?डॉ.स्मिता लेले - फूड टेक्नॉलॉजी हा इंटर डिसिप्लिनरी विषय आहे. त्यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीशी निगडीत वेगवगळे विषय येतात. अन्नाची नासाडी होऊ नये याकरता ते चांगलं कसं टिकवता येईल या मायक्रोबायोलॉजीतल्या विषयाचाही यात अभ्यास केला जातो. त्यामुळे फूड टेक्नॉलॉजीत मायक्रोबायॉलॉजीतल्या याही विषयावर संशोधन करता येईल. बायो केमिस्ट्री, बायो टेक्नॉलॉजीचे जे विषय आहेत ते पोषणमूल्यांच्या दृष्टीनं फूड टेक्नॉलॉजीत अभ्यासले जातात. त्यावरही संशोधन करता येईल. किंवा आता बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या दृष्टीनं म्हणजे शेतीच्या जे नंतर होतं ते पोस्ट हारवेस्टिंग, पेस्ट रेझिस्टंट, अधिक अन्नाची निर्मिती करणं म्हणजे या प्रकारच्या शेतकीय बयोटेक्नॉलॉजीचाही उपयोग फूड टेक्नॉलॉजीत होतो. नंतर या शेतीच्या उत्पादनांवर कशी प्रक्रिया केली जाईल यावरही फूड टेक्नॉलॉजीत वापर करता येतो. उदाहरणार्थ बोलायचं झालं तर टोमॅटोचं घेऊया. टोमॅटोतून लायकोबीन नावाचा घटक मिळतो. कोणत्या प्रकारच्या टोमॅटोचं उत्पादन केलं तर त्यातून सर्वात जास्त प्रमाणात लायकोबीन नावाचा घटक मिळणार, तर तो टोमॅटो बनवण्यासाठी काय करायला पाहिजे... अशाप्रकारचं संशोधन करायला पाहिजे. सीताफळ आवडणा-यांना बीनबियांचं सीताफळ खायला मिळालं तर...अशाप्रकारचं संशोधन करता येईल. या फूड टेक्नॉलॉजीमध्ये फूड केमिस्ट्रीवरही संशोधन करता येतं. फंडामेंटल लेव्हलला वेगवेगळे मॉलिक्युल एकमेकांशी कसे वागतात यावरही संशोधन करता येतं. केमिकल इंजिनिअरिंगची फूड टेक्नॉलॉजी ही स्पेशलाईज्ड शाखा असली तरी फूडचे मॉलिक्युल हे सेन्सिटीव्ह असतात. अन्नावर प्रक्रिया करताना त्या मॉलिक्युलशी फार प्रेमानं हाताळावे लागतात. तेव्हा हाही फूड टेक्नॉलजीतल्या स्पेशलायझेशनचा विषय असू शकतो. हल्ली फूड टेक्नॉलॉजीची एक नवीन शाखा उदयास आली आहे. तिचं नाव आहे न्युट्रोजिनॉमिक्स. तर त्यातही स्पेशलायझेशन करता येईल. न्युट्रोजिनॉमिक्स या नवीन शाखेविषयी सांगा ? डॉ.स्मिता लेले - काही मुलांमध्ये जन्मापासूनच काही डिफेक्टस् असतात. तर अशा मुलांना जन्मापासूनच अशाप्रकारचं खाणं द्यायचं ज्यानं ते डिफेक्टस् कमी होतील. किंवा असं खाणं आईला द्यायचं... त्यामुळे असं डिफेक्टीव्ह मूल जन्माला येणार नाही. युडीसीत डॉ. मंजिरी मुखर्जी या त्याच्यावर संशोधन करत आहेत. ऑरगॉनिक केमिस्ट्रीतून एमएससी झाल्यावर फूड टेक्नॉलजीत जाता येतं का ? रिसर्चमध्ये काही करता येतं का ? डॉ.स्मिता लेले - ऑरगॅनिक केमिस्ट्रीतून शिक्षण झाल्यावर फूड टेक्नॉलॉजीत जाता येत नाही. पण त्याक्षेत्राशी निगडीत रिसर्चमध्ये काम करू शकता. म्हणजे तर तुम्ही एमएसीबाय रिसर्च घेतलं तर तुमचा जो गाईड असेल तो फूड टेक्नॉलॉजीशी संबंधित असायला हवा. किंवा अन्नपदार्थांच्या मोठ्या कंपनीत फूडशी रिलेटेड काही रिसर्च केले की जाता येईल. पण शैक्षणिदृष्ट्या जाता येणार नाही. फिजिक्समधून फूड टेक्नॉलजीत जाता येईल का ? डॉ.स्मिता लेले - फिजिक्समधून बायोटेक्नॉलॉजी नाही पण बायो फिजिक्समध्ये मात्र नक्की जाता येईल. पीएचडी करताना बायोटेक्नॉलॉजी आणि बायोफिजिक्समध्ये जाता येईल. हे इन्डायरेक्ट जम्पिंग करावं लागेल. फूड टेक्नॉलॉजी या विषयातलंपरदेशी शिक्षण आणि तिथल्या संधीविषयी काय सांगाल ? डॉ.स्मिता लेले - परदेशात विशेषत: अमेरिकेत ओपन शिक्षणाच्या संधी असल्यामुळे तसंच फूड टेक्नॉलॉजीतल्या वेगळ्या वेगळ्या शिक्षणाच्या संधी असल्यामुळे तिथे शिक्षणासाठी सहज जाता येईल. अमेरिकेत जाऊन मेकअप कोर्सेस करता येतील. मेकअप कोर्सेस म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिट दुस-याविषयाचं घेऊन स्वत:ला त्या पातळीपर्यंत आणू शकणं. युडीसीटीमध्ये इंटर चेंजेबल कोर्स सुरू करण्याचं आमचं स्वप्नं आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्स करून थेट फूड टेक्नॉलजी आला , असं होणार नाहीये. तर फिजिक्स, केमिस्ट्री , बायोलॉजी हे फूड टेक्नॉलॉजीशी संलग्न विषय आहेत. तर अशा विषयांना सलग्न करून फूड टेक्नॉलजीत येता येईल किमान इतकं तरी आम्ही करणार आहोत. आता भारतात तशी व्यवस्था नाहीये. पण परदेशात मेकअप कोर्सची व्यवस्था आहे. आहारांचा संदर्भ हा औषधांशीही जोडला जातो. न्युट्रॉस्युटीकल विषयी सांगा ? डॉ.स्मिता लेले - पूर्वी ऍन्टीबायॉटीकचं पर्व होतं. म्हणजे जंतूंना मारण्याचं पर्व होतं. आता प्रो बायॉटीक म्हणजे चांगल्या जंतूंचं संरक्षण आणि संवर्धन करा. न्युट्रॉस्युटिकल म्हणजे औषधांचा वापर टाळा आणि असा औषधयुक्त आहार घ्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2009 03:16 PM IST

फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर (भाग - 2)

फूड टेक्नॉलॉजीतलं करिअरचा दुसरा भाग -

फूड टेक्नॉलॉजीमधल्या रिसर्चचे एरियाज कोणते आहेत ?डॉ.स्मिता लेले - फूड टेक्नॉलॉजी हा इंटर डिसिप्लिनरी विषय आहे. त्यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीशी निगडीत वेगवगळे विषय येतात. अन्नाची नासाडी होऊ नये याकरता ते चांगलं कसं टिकवता येईल या मायक्रोबायोलॉजीतल्या विषयाचाही यात अभ्यास केला जातो. त्यामुळे फूड टेक्नॉलॉजीत मायक्रोबायॉलॉजीतल्या याही विषयावर संशोधन करता येईल. बायो केमिस्ट्री, बायो टेक्नॉलॉजीचे जे विषय आहेत ते पोषणमूल्यांच्या दृष्टीनं फूड टेक्नॉलॉजीत अभ्यासले जातात. त्यावरही संशोधन करता येईल. किंवा आता बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या दृष्टीनं म्हणजे शेतीच्या जे नंतर होतं ते पोस्ट हारवेस्टिंग, पेस्ट रेझिस्टंट, अधिक अन्नाची निर्मिती करणं म्हणजे या प्रकारच्या शेतकीय बयोटेक्नॉलॉजीचाही उपयोग फूड टेक्नॉलॉजीत होतो. नंतर या शेतीच्या उत्पादनांवर कशी प्रक्रिया केली जाईल यावरही फूड टेक्नॉलॉजीत वापर करता येतो. उदाहरणार्थ बोलायचं झालं तर टोमॅटोचं घेऊया. टोमॅटोतून लायकोबीन नावाचा घटक मिळतो. कोणत्या प्रकारच्या टोमॅटोचं उत्पादन केलं तर त्यातून सर्वात जास्त प्रमाणात लायकोबीन नावाचा घटक मिळणार, तर तो टोमॅटो बनवण्यासाठी काय करायला पाहिजे... अशाप्रकारचं संशोधन करायला पाहिजे. सीताफळ आवडणा-यांना बीनबियांचं सीताफळ खायला मिळालं तर...अशाप्रकारचं संशोधन करता येईल. या फूड टेक्नॉलॉजीमध्ये फूड केमिस्ट्रीवरही संशोधन करता येतं. फंडामेंटल लेव्हलला वेगवेगळे मॉलिक्युल एकमेकांशी कसे वागतात यावरही संशोधन करता येतं. केमिकल इंजिनिअरिंगची फूड टेक्नॉलॉजी ही स्पेशलाईज्ड शाखा असली तरी फूडचे मॉलिक्युल हे सेन्सिटीव्ह असतात. अन्नावर प्रक्रिया करताना त्या मॉलिक्युलशी फार प्रेमानं हाताळावे लागतात. तेव्हा हाही फूड टेक्नॉलजीतल्या स्पेशलायझेशनचा विषय असू शकतो. हल्ली फूड टेक्नॉलॉजीची एक नवीन शाखा उदयास आली आहे. तिचं नाव आहे न्युट्रोजिनॉमिक्स. तर त्यातही स्पेशलायझेशन करता येईल. न्युट्रोजिनॉमिक्स या नवीन शाखेविषयी सांगा ? डॉ.स्मिता लेले - काही मुलांमध्ये जन्मापासूनच काही डिफेक्टस् असतात. तर अशा मुलांना जन्मापासूनच अशाप्रकारचं खाणं द्यायचं ज्यानं ते डिफेक्टस् कमी होतील. किंवा असं खाणं आईला द्यायचं... त्यामुळे असं डिफेक्टीव्ह मूल जन्माला येणार नाही. युडीसीत डॉ. मंजिरी मुखर्जी या त्याच्यावर संशोधन करत आहेत. ऑरगॉनिक केमिस्ट्रीतून एमएससी झाल्यावर फूड टेक्नॉलजीत जाता येतं का ? रिसर्चमध्ये काही करता येतं का ? डॉ.स्मिता लेले - ऑरगॅनिक केमिस्ट्रीतून शिक्षण झाल्यावर फूड टेक्नॉलॉजीत जाता येत नाही. पण त्याक्षेत्राशी निगडीत रिसर्चमध्ये काम करू शकता. म्हणजे तर तुम्ही एमएसीबाय रिसर्च घेतलं तर तुमचा जो गाईड असेल तो फूड टेक्नॉलॉजीशी संबंधित असायला हवा. किंवा अन्नपदार्थांच्या मोठ्या कंपनीत फूडशी रिलेटेड काही रिसर्च केले की जाता येईल. पण शैक्षणिदृष्ट्या जाता येणार नाही. फिजिक्समधून फूड टेक्नॉलजीत जाता येईल का ? डॉ.स्मिता लेले - फिजिक्समधून बायोटेक्नॉलॉजी नाही पण बायो फिजिक्समध्ये मात्र नक्की जाता येईल. पीएचडी करताना बायोटेक्नॉलॉजी आणि बायोफिजिक्समध्ये जाता येईल. हे इन्डायरेक्ट जम्पिंग करावं लागेल. फूड टेक्नॉलॉजी या विषयातलंपरदेशी शिक्षण आणि तिथल्या संधीविषयी काय सांगाल ? डॉ.स्मिता लेले - परदेशात विशेषत: अमेरिकेत ओपन शिक्षणाच्या संधी असल्यामुळे तसंच फूड टेक्नॉलॉजीतल्या वेगळ्या वेगळ्या शिक्षणाच्या संधी असल्यामुळे तिथे शिक्षणासाठी सहज जाता येईल. अमेरिकेत जाऊन मेकअप कोर्सेस करता येतील. मेकअप कोर्सेस म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिट दुस-याविषयाचं घेऊन स्वत:ला त्या पातळीपर्यंत आणू शकणं. युडीसीटीमध्ये इंटर चेंजेबल कोर्स सुरू करण्याचं आमचं स्वप्नं आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्स करून थेट फूड टेक्नॉलजी आला , असं होणार नाहीये. तर फिजिक्स, केमिस्ट्री , बायोलॉजी हे फूड टेक्नॉलॉजीशी संलग्न विषय आहेत. तर अशा विषयांना सलग्न करून फूड टेक्नॉलजीत येता येईल किमान इतकं तरी आम्ही करणार आहोत. आता भारतात तशी व्यवस्था नाहीये. पण परदेशात मेकअप कोर्सची व्यवस्था आहे. आहारांचा संदर्भ हा औषधांशीही जोडला जातो. न्युट्रॉस्युटीकल विषयी सांगा ? डॉ.स्मिता लेले - पूर्वी ऍन्टीबायॉटीकचं पर्व होतं. म्हणजे जंतूंना मारण्याचं पर्व होतं. आता प्रो बायॉटीक म्हणजे चांगल्या जंतूंचं संरक्षण आणि संवर्धन करा. न्युट्रॉस्युटिकल म्हणजे औषधांचा वापर टाळा आणि असा औषधयुक्त आहार घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2009 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close