S M L

विधानसभा निवडणुकीत बीएसपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ

10 डिसेंबर, उत्तर प्रदेशमायावती यांच्या बीएसपीनं म्हणजेच बहुजन समाज पक्षानं उत्तर भारतातील चार राज्यांच्या निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या नाहीत. मात्र आपल्या जागा आणि मतांची टक्केवारी निश्चित वाढवलीय. यामुळे लोकसभा निवडणुकीत बसपला उत्तर प्रदेशाबाहेरही नजरेआड करुन चालणार नाही, हेच यावरुन दिसून येतंय. मध्यप्रदेशमध्ये 2003 मध्ये बीएसपीकडे फक्त दोन आमदार होते. मिळालेल्या मतांची टक्केवारी होती 7.26 टक्के. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपला सात जागा मिळाल्या. मतांची टक्केवारी होती 11 टक्के. छत्तीसगड विधानसभेत 2003 साली बीएसपीचे दोन आमदार होते तर 3.5 टक्के मतं मिळाली होती. 2008च्या निवडणुकीत विधानसभेच्या जागा वाढल्या नाहीत पण मतांची टक्केवारी साडेतीन टक्क्यावरुन साडे सहा टक्के एवढी झाली. राजस्थानमध्ये 2003 साली बीएसपीला दोन जागा मिळाल्या होत्या. मतं मिळाली होती 3.97 टक्के. 2008 च्या निवडणुकीत बीएसपीचे आमदार दोनावरुन सहावर गेले.मतं मिळाली आठ टक्के. दिल्लीत 2003 मध्ये बीएसपीचा एकही आमदार निवडून आला नाही. मतं मिळाली होती पाच पूर्णांक सात टक्के. 2008च्या निवडणुकीत बीएसपीचे दोन आमदार निवडून आले आणि मतं मिळाली 12 टक्के. प्रत्येक निवडणुकीत स्वबळावर सगळ्या जागा लढायच्या. मतांची टक्केवारी वाढवायची. आणि सत्तेपर्यंत पोहोचायचं असं बीएसपीचं धोरण आहे. हत्ती उत्तर भारतात पसरतोय. पाच वर्षांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्याच्या चालीनं राजकीय क्षेत्र हादरणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2008 02:39 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2008 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close