S M L

दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत झाल्याचं उघड

10 डिसेंबर, मुंबई मुंबईवर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांना मदत करणार्‍या पाचजणांच्या शोध सध्या मुंबई पोलीस घेत आहेत. याप्रकरणात कोलकात्यात पकडलेल्या दोघांकडून पोलिसांनी याबाबतची माहिती मिळालीय. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात अतिरेक्यांना मुंबईतल्याच पाच लोकांनी मदत केल्याची माहिती पुढे येतेय. हे पाचही लोक दाऊदशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. चौकशीत माहिती समोर आली, त्यानुसार एकजण बिल्डरक्षेत्रात काम करणारा, दुसरा हवालाचा व्यवहार करणारा, तिसरा मुंबईत असलेली दाऊदची बेहिशोबी मालमत्ता सांभाळणारी व्यक्ती, चौथा बंदरावर दाऊदचा व्यवहार सांभाळणारा व्यक्ती आणि पाचवा एक्सपोर्टचा काम सांभाळणारा. कोलकात्यात पकडलेल्या दोघांकडून चौकशीदरम्यान ही माहिती पुढे आलीय. मुंबई पोलीस सध्या यांच्या शोधात आहेत. तौफिक रहमान आणि मुख्तार अहमद यांच्या चौकशीत ही माहिती पुढे आलीय. सध्या हे दोघे कोलकाता पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुख्तार अहमद पोलिसांचा वेष परिधान करून लष्कर- ए - तोयबासाठी काम करत होता. तो नेहमीच फहीम अन्सारीच्या संपर्कात असायचा, असं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. फहिम अन्सारी सध्या उत्तरप्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. वेगवेगळया नंबरच्या माध्यमातून मुख्तार गेली काही महिने फहिमसोबत संपर्कात होता, असं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. तौफिक रहमानची पार्श्वभूमीही गुन्हेगारीची आहे. शिवाय त्याच्या तपासातून वेगवेगळी माहिती पुढं येतेय. यापूर्वी मुख्तार बर्‍याचवेळा मुंबईत आला होता. याहल्ल्याच्या तपासातील मुख्तार हा एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. मुख्तार आणि तौफिकनं कुठून सिमकार्ड खरेदी केले, शिवाय त्यांना मोबाईल फोन कुठून मिळाला. त्या दुकानदारांचाही तपास मुंबई पोलीस करतेय. तसंच हल्ला होण्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर अतिरेक्यांना मदत करणार्‍या मुंबईतल्या पाच लोकांचाही शोध पोलीस घेत आहेत. मुख्तारच्या चौकशीदरम्यान त्याने ही नावं पोलिसांना सांगितल्याचं समजतंय. मुंबईतले पाचजण पोलिसांच्या रडारवर असल्यानं लवकरच ती नावं पुढं येण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2008 03:15 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2008 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close