S M L

जालना बॉम्बस्फोटप्रकरणी धावडेची नार्को टेस्ट होणार

11 डिसेंबर जालनासंजय वरकड जालन्यातल्या कादरिया मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राकेश धावडे याची डिसेंबरनंतर नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. जालन्याच्या सत्र न्यायालयाने धावडेची नार्को करायला परवानगी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. हिंदुत्ववादी संघटनांचा दबाब झुगारून एटीएसनं याप्रकरणाचा पर्दाफाश केला. त्यामुळेच मराठवाड्यापासून सुरू झालेल्या स्फोटांचा मालेगावपर्यंतचा घटनाक्रम आणि कट उघड झाला.आता राकेश धावडेची जालन्यातील स्फोटप्रकरणी नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील बॉम्बस्फोटातील तपासात पोलिसांनी ठेवलेल्या त्रुटी आणि आरोपींना पाठीशी घालण्याचे प्रयत्नही उघड झाले आहेत. आता राकेश धावडेच्या नार्को टेस्टमुळे अनेक गोष्टी उघडकीस येऊ शकतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2008 10:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2008 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close