S M L

ऑफ बीट करिअर

टेक ऑफमध्ये विविध करिअरविषयी जाणून घेतो नि ते करिअर अत्यंत यशस्वीपणे हाताळणा-या व्यक्तींशी बोलतो. 7 मार्चच्या टेक ऑफमध्ये अयआय.टी. क्षेत्रातल्या अत्यंत नामवंत व्यक्ती नीला भटाचारजींशी बोलायला मिळायलं. गेल्या 3 दशकांपासून त्या आयटीच्या क्षेत्रात आहेत. काळे कन्सल्टन्सीच्या एअरलाईन्स डिव्हिजनच्या त्या प्रमुख आहेत. गेले अनेक वर्ष स्वंतंत्र व्यवसाय आणि आता काळे कन्सल्टन्सीबरोबर काम असं त्यांचं मोठं करिअर आहे. नीलाजी तुम्ही काळे कन्सल्टन्सीमध्ये काम करतात, आयटीच्या क्षेत्रात काम करतात आणि एअरलाईन्स डिव्हिजन सांभळता... एका वेळी तीन तीन गोष्टी करता. तुमच्या कामाचं स्वरूप नेमकं कसं आहे ? नीला भटाचारजी : एअरलाइन्स डिव्हिजन एस.बी. यु. हेड म्हणजे कंपनीतली जी कम्पलिट प्रॉफिट ऍन्ड लॉसची जबाबदारी असते ती माझी आहे. टॉप लाइन म्हणजे रेव्हेन्यू , प्रॉफीट आणि बॉटम लाइन म्हणजे लॉस काय आहे, किती आहे ही सगळी जबाबदारी माझी आहे. म्हणजे बुके आणि ब्रीक बॅट हे सगळं माझ्याचं वाट्याला येतं. गेली तीन दशकं म्हणजे गेल्या 30 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात आणि काळे कन्सल्टन्सीमधलाही तुमचा प्रवास खूप मोठा आहे. नुसती एक स्त्री म्हणून नव्हे तर आय.टी. क्षेत्रातली व्यक्ती म्हणून तुमचा या क्षेत्रातला प्रवास जाणून घ्यायला आवडेल ? याच्यासाठी की तुम्ही मुळातल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर नाही आहात ? नीला भटाचारजी : मी मॅथमॅटिक्स या विषयातून बी.एस्. सी केलं. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटची डीग्री कम्प्युटर सायन्स या विषयातून घेतली. बी.एस.सी मॅथमॅटीक्स या विषयातून केल्यावर पुण्यात एम.एस.सी मॅथमॅटीक्स करायला गेले होते. दोन महिन्यांनी पुणे विद्यापीठातून फिरत असताना माझ्या मनात मनात चटकन एक विचार डोकावला की, मला मॅथमॅटीक्समधून खरंच एम.एस.सी करायचं आहे का, तर नाही. कारण माझं व्यक्तिमत्त्व हे बसून पीएचडी करणारं नाहीये. माझ्या आईनं फिजिक्स मधून पी.एच.डी केली होती. मी तिच्यासारखं असं काही रिसर्चचं काम करेन, असं वाटलं नव्हतं आणि मी ठरवलंही नव्हतं. मॅथमॅटीक्समधून पी.एच.डी करण्याचा नाद सोडल्यावर त्यावेळी पुढे काय करायचं हाही विचार मी केला नव्हता. मॅथमॅटिक्समधून पी.एच.डी. करणं सोडल्यावर माझ्यापुढे काही पर्याय निर्माण झालं. त्यातला पहिला पर्याय होता मुंबईत परतायचं. मी एकीकडे थिएटर, टीव्ही सिररीयलमध्ये काम करत होते. तर अभिनयाचा पर्यायही आपसुकच समोर आला. त्यावेळी पुणे युनिव्हर्सिटी कम्प्युटर सायन्सचा नवीन कोर्स सुरू करत होती. 12 वीत असताना मला कम्प्युटर प्रोगामिंग हा विषय होता. त्यावेळी तो विषय मला आवडलाही होता. ट्राय करायला काय हरकत आहे, असा विचार करत मी कम्प्युटर सायन्सच्या कोर्सला ऍडमिशन घेण्याचं ठरवलं. आधि ऍडमिशन मिळाली तर कोर्स पूर्ण करण्याचा विचारही केला. मी अप्लाय केला. मला ऍडमिशन मिळाली. अशाप्रकारे मी मॅथमॅटिक्सकडून कम्प्युटर सायन्सकडे वळले. तिथूनच माझ्या आयटीतल्या प्रवासाला सुरुवात झाली. तुम्ही गेली अनेक वर्षं या क्षेत्रात आहेत. तर कम्प्युटर प्रोग्रामर होण्यासाठी काय प्रकारचा माईण्ड सेट असावा लागतो ? त्यातलं टेक्निक कळण्यासाठी नाही तर उत्तम प्रोगामर होण्यासाठी... नीला भटाचारजी : आयटी म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलजीचा प्रोग्रामिंग हा भाग आहे. त्याच्यासाठी तुमचं बेसिक लॉजिकल थिंकिंग हे खूपच दांडगं असावं लागतं. मुळात तुम्हाला आवड पाहिजे, प्रश्न विचारण्याची उत्सुकता पाहिजे. जर तुम्हाला टेक्निकल गोष्टींत रस असेल तर तुम्हाला रिसर्चचीही आवड असायला पाहिजे. जर तुमचं गणित चांगलं असेल तर तुम्हाला या गोष्टीचा खूपच फायदा होतो. इंजिनिअरिंग, मॅथमॅटीक्स या विषयांचा अभ्यासही कम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी फायदेशी ठरतो. आयटीतलं बिझनेस हे दुसरं क्षेत्र आहे, त्यासाठीच्या तुमच्या गरजा ह्या पूर्णपणे वेगळ्या असतात. माझी बॅगराऊण्ड अशी की, मी सुरुवात प्रोग्रॅमिंगपासून केली. फोरट्रॉन, कोबॅन, सीई म्हणजे तेव्हा कम्प्युटर टर्मचं नव्हती. कम्प्युटर हे पंच कार्डसारखे असायचे. मी त्याच्यापासून पुष्कळ दूर आले. बिझनेसमध्ये गेले. माझी पर्सनॅलिटी होती म्हणून मी सेल्स केलं, मार्केटिंग केलं, अशी मी इतर वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केलेली आहेत. तुम्ही स्वत:ची सॉफ्टसेल नावाची कंपनी 12 ते 13 वर्षं यशस्वीपणे चालवलीत. आयटीतल्या आंत्रप्रेन्युअर म्हणूनही तुमचं नाव आहे. हा सगळ्या तुमच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल ? नीला भटाचारजी : ज्यावेळह मी माझी स्वत:ची सॉफ्ट सेल ही कंपनी सोडून दुस-या कंपनीत कामला गेले तेव्हा मला सगळ्यांना वेड्यात काढलं. पण काय झालं जेव्हा डॉट कॉम बुम सुरू झाला तेव्हा तेव्हा आयटीत बहुतेक जण आपल्या कंपन्या सुरू करत होते. मात्र मी नेमकं उलटं केलं. डॉट कॉम बूम सुरू झाल्यावर मी माझी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. कारण 13 वर्षं कंपनी चाल्यावर तिचा विकास हा एका ठरावीक लेव्हलला आलेला होता. त्यावेळी माझ्यासमोर दोन पर्याय होते एकतर हे सगळं तसंच सुरू ठेवणं नाहीतर काहीतरी वेगळं करणं. मला तर खरं सांगायचं झालं तर कमालीचा कंटाळा आला होता. सॉफ्टसेलसारखा जेव्हा स्वत:चा एन्टरप्राइज असतो, तेव्हा काय त-हेनं काम करावं लागतं ? म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलंत की, कंपनीत आलेल्या प्रत्येक माणसाला चहा मिळतोय की नाही, याची जबाबदारी आपल्याकडे असते... तर तुम्ही असे काही अनुभव सांगा ? नीला भटाचारजी : जेव्हा तुमची स्वत:ची कंपनी असते तेव्हा तो 24 X 7 जॉब असतो. आणि सगळं बघावं लागतं. पाहुण्यांची उठबस होतेय की नाही, ग्राहकांच्या मागण्या, मागणीप्रमाणे त्यांना पुरवठा होतोय की नाही, एच. आर हे सगळंच कंपनीचा सर्वेसर्वा या नात्यानं तुम्हाला बघावं लागतं. म्हणजे कंपनीची क्रेडिबिलीटी आणि अकाउन्टेबिलीटी ही तुमच्या खांद्यावर असते. यातली चांगली गोष्ट अशी की तुम्हाला स्वातंत्र्य असतं. कारण तुम्ही बॉस असतात. ऍट द सेम टाईम तुमच्यावर जबाबदारीही असते.आणि ती तुम्ही जसा तुमचा बिझनेस वाढवता त्याप्रमणात ती वाढते. आणि हा तुमच्या लेखी एक वेगळा अनुभव असतो. पण जेव्हा तुम्ही दुस-या कंपनीत काम करता तेव्हा असं नाही की तुमची रिस्पॉन्सिबिलीटी कमी आहे. पण ती जाबाबदारी ही विभागलेली असते. आणि तुम्ही जे काम करता त्या कामाच्या चांगल्या वाईट परिणामांना तुम्ही जबाबदार असता. त्याचा तोटा असा की तुम्ही एका टीमबरोबर काम करत असता. तुम्ही अजिबात बिग बॉस नसता. म्हणजे तुम्हाला तुमच्या टीममधल्या इतर लोकांबरोबर काम करावं लागतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2009 07:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2009 07:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close