S M L

हरवलेल्या मुली - भाग 1

हरवलेल्या मुली - भाग 1वंशाला दिवा आणि म्हातारपणी सांभाळ व्हावा यासाठी अनेक लोक मुलाची अपेक्षा करतात. पण या अपेक्षेपोटी मुलीची गर्भातच सर्रास हत्या होत आहे. त्यामुळे आता मुलींची संख्याच दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. प्रत्येक जनगणनेनुसार स्त्री-पुरुषांच्या प्रमाणात मुलींचा आकडा कमी होताना दिसतोय.पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि गुजरात यांच्यासोबत आता पुरोगामी म्हणवून घेणा-या महाराष्ट्रातील मुलींची संख्या कमी होत चालली आहे.भारतात 1991च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 945 मुली असा आकडा होता. हे प्रमाण 2001च्या जनगणनेत 1000 पुरुषांमागे 927 मुली असं झालं. महाराष्ट्रात स्त्री-पुरुषांचं हे प्रमाण 2001मध्ये1000 पुरुषांमागे 922 असं होतं. तेचप्रमाण 2005मध्ये 1000 पुरुषांमागे 898 असं झालं आहे. महाराष्ट्रात 1000 मुलांच्या तुलनेत मुलींच प्रमाण जळगावमध्ये 880, औरंगाबादमध्ये 890, अहमदनगरमध्ये 854, बीडमध्ये 894, साता-यात 878, सोलापूरमध्ये 895, उस्मानाबाद- 894, सांगलीत 851 आणि कोल्हापूरमध्ये 839 असं आहे. या सगळ्या जिल्हयांमधला बहुतांश भाग सधन आहे. विदर्भ, नंदुरबार आणि रत्नागिरीत मुलींच प्रमाण तुलनेत जास्त आहे. यावरून ज्या भागात सधनता आहे तिथे स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण जास्त आहे असं दिसतं. मुलगी म्हणजे परक्याचं धन असा समज असणा-या आपल्या समाजात हा प्रश्न थेट संपत्ती आणि वारसा हक्काशी जोडलेला आहे. त्यामुळेच हुडांबळीसारखे प्रकार घडतात.मुलगा आधार असतो. म्हातारपणाची काठी असते. मुलगी म्हणजे परक्याचं धन. शेवटी दुस-याच्या घरातच जाते. त्यामुळे मुलगी झाली तरी चालेल पण मुलगा हवाच हा समज अधिकाधिक पक्का झालेला दिसतो. मुलीच्या लग्नासाठी, हुंडयासाठी पैसा जमवायला लागतो. आणि शेवटी काय तर ते परक्याचं धन होणार म्हणून मुलगीच नको ही वैचारिकता सर्वत्र परसत चालली आहे.वैज्ञानिक शोधामुळे मुलीचा गर्भच नाकारण्याचं तंत्र या सुशिक्षित समाजाला मिळालं. आणि सेक्स सिलेक्टिव ऍबोर्शन हा धंदा सुरू झाला. गर्भातच लिंग ओळखण्यासाठी अल्ट्रा साऊंड मशिनचा वापर केला जाऊ लागला.खरंतर या तंत्राचा वापर गर्भातील शारीरिक व्यंग शोधण्यासाठी करायची परवानगी होती. पण हळूहळू त्याचा गैरवापर होऊ लागला. स्त्रीभ्रूण हत्येविरोधात कायदे बनवले गेले पण सोनोग्राफी तंत्रामुळे तर गर्भचिकित्सा अधिक सोपी झाली. आणि त्याच्या बेसुमार वापराने मुलीचा गर्भ शोधणं आणि संपवणं सुरुच राहीलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2009 10:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2009 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close