S M L

इंग्रजी संभाषण

खूप चांगलं मातृभाषेत बोलता येत असूनही इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे अनेकदा नोकरी मिळायाला अडचण येते. हे लक्षात घेऊन टेक ऑफ मध्ये' इंग्रजी संभाषण ' या विषयावर बोललं गेलं.नुसतं चांगलं इंग्रजी बोलणं म्हणजे त्या भाषेबद्दलची जाण असणं अभिप्रेत असतं. त्या भाषेतलं आपलं चांगलं वाचन लागतं. त्याभाषेमध्ये विचार करता यावे लागतात. अनेकदा मराठी माध्यमातून शिकलं किंवा अगदी इंग्रजी माध्यमातून शिकलं तरी चांगलं संभाषण येणं ही एकप्रकारची कला आहे. ते शिकावं लागतं आणि ते सरावातून येतं. हेच टेक ऑफमध्ये इंग्रजी संभाषण या विषयातून सांगितलं गेलं. इंग्रजी संभाषण या विषयावर बोलण्यासाठी आणि टीप्स देण्यासाठी नरेंद्र वर्दे आणि भाषातज्ज्ञ अविनाश बिनीवाले आले होते.इंटरव्ह्यूला जाताना, एकमेकांशी इंग्रजी भाषेतून बोलताना माझं इंग्रजी ग्रॅमॅटिकली बरोबर आहे की नाही ही भीती अगदी मराठी नाही तर इंग्रजी मीडियममधल्या मुलालाही वाटत असते. तुम्ही त्यांच्या ट्रेनिंगची सुरुवात कशी करता ?नरेंद्र वर्दे : आमच्याकडे जेव्हा जीमॅटसाठी किंवा कॅटसाठी मुलं येतात तेव्हा आम्ही त्या मुलांना सांगतो की, तुमचं इंग्रजी खूपच महत्त्वाचं आहे. आता आपल्याला रिअलाईज केलं पाहिजे की, फ्रान्समध्ये फ्रेंच, जर्मनीमध्ये जर्मन ही बीझनेस लँगवेज असली, आज तुमचं मराठी चांगलं आहे पण इंग्रजी नाही तर तुम्हाला जॉब मिळू शकत नाही; त्यासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास मुलांनी करणं गरजेचा आहे. तोही कसं बोलायचं शब्दांचे उच्चार कसे करतात हेही महत्त्वाचं आहे.नेहमी इंग्रजीची भीती वाटते... हा आपल्यामधला खरोखरच न्यूनगंड आहे की, भारतात इंग्रजी बोलायला येणा-यांची संख्या कमी आहे, त्याबद्दल वेगळे प्रयत्न केले पाहिजेत.अविनाश बिनीवाले - न्यूनगंड हा थोड्याफार प्रमाणात आहे आणि न्यूनत्त्वही आहे. त्याच्यासाठी जेवढे प्रयत्न करायला हवेत ते केले जात नाहीत. ब-याच लोकांनी हे वाचलेलं आहे, म्हटलेलं आहे आणि मी सुद्धा ऐकलेलं आहे आणि ते असं आहे - इंग्लिश टाइम्सचा अग्रलेख धाडधाड वाचला पाहिजे म्हणजे तुम्हाला इंग्रजी चांगलं धाड धाड बोलता येईल. पण जर वाचून बोलता आलं असतं तर सगळ्यांनाच बोलता आलं असतं. तर असं नाहीये. कारण वाचन ही एक वेगळी कला आहे, ते एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि बोलणं हे वेगळं आहे. म्हणजे पळण्याचा सराव करून जर तुम्ही बोलत असाल की मला पोहता येईल तर असं होणार नाही. तुम्हाला गटांगळ्या खाव्या लागतील, कदाचित तुम्ही बुडालही. तर बोलण्यासाठी आपण जे काही करायला पाहिजे ते करत नाही आणि आपल्याला चांगलं इंग्रजी बोलता यायला पाहिजे अशी आपण कल्पना करतो, हे चुकीचं आहे. त्यामुळेच तर आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाही.सर मराठी माध्यमातून जी मुलं शिकतात त्यांनी उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी काय करायला पाहिजे ?अविनाश बिनीवाले - भाषा आणि विचार विकसित होणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस विकसित होत असतात. नुसती भाषा आहे पण त्या माणसाजवळ विचार नाही, असं कधीच होत नाही. आणि विचार विकसित झालेले असतील तर दुसरी कोणती भाषा बोलणं हे अजिबात कठीण नाही. विचार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते आणि ती म्हणजे आपली मातृभाषा. जर आपण मातृभाषेमध्ये कच्चे राहिलो तर आपला पुढचा विचार हा नीट विकसित होत नाही. आणि विचारच नीट विकसित झाला नाही तर पुढच्या पुढच्या भाषा शिकणं हे कठीण होऊन जातं. मातृभाषेतून शिक्षण झालेल्या माणसाला वर्षभरात कोणतीही दुसरी भाषा मग ती देशी असो परदेशी असो ती अगदी सहजच शिकता येते.सर तुमचं जर्मन भाषेवरचं लिखाण आम्ही वाचलेलं आहे. तुमचे त्या भाषेबद्दलचे लेख आम्ही वाचले आहेत. मुंबईतलं फ्रेंच केंद्र, मॅक्सम्युलर भवनमध्ये जेव्हा आम्ही जातो ते अनेकदा असं जाणवलंय की, एक दोन वर्षांमध्ये लोक चांगलं जर्मन, फ्रेंच बोलायला लागतात, बाहेरच्या देशात जाऊन त्या मीडियमध्ये शिकतातही. मग दहावी - बारावीपर्यंत अभ्यासक्रमात इंग्रजीचे धडे असूनही मुलांना का चांगलं इंग्रजी बोलता येत नाही ?अविनाश बिनीवाले - दोनवर्षांमध्ये मुलं फ्रेंच, जर्मन आणि रशियन शिकून त्यात्या देशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर त्या भाषेतलं विद्यापीठ दर्जाचं शिक्षण घेतात. पीएच करू शकतात. आणि 12 ते 15 वर्षं इंग्रजी शिकूनही इथल्या विद्यार्थ्याला नीट इंग्रजी बोलता येत नाही... यात दोन महत्त्चाच्या गोष्टी आहेत. फ्रेंच, जर्मन शिकणारा विद्यार्थी हा अडल्ट दर्जाचा आहे. त्याला जर आपण इंग्रजी शिकवलं तर त्याला एक- दोन वर्षात फाड फाड इंग्रजी येईल. पण ज्या मुलाला धड चालता आणि पळता येत नाही, त्याच्याकडून जर आपण मॅरेथॉनमध्ये धावण्याचा सराव करून घेतला तर काय होईल... बिचा-याच्या आयुष्याचं नुकसान होईल आणि बालपणही चोरीला जाईल. तर योग्यवायात गोष्टी केल्या तर बरंच काही साध्य होतं. प्रगत देशात मुलांना शाळेत घालण्याचं वय सात वर्षं आहे. सात वर्षांच्या आत जर जर्मनीमध्ये मुलांना शाळेत घातलं तर शाळेच्या चालकांना आणि पालकांना दोघांनाही शिक्षा होते. पण आपल्याकडे आपण चार - साडेचार वर्षांच्या मुलांना इयत्ता पहिलीत ढकलतो. तेव्हा मुलांचं शिक्षण सुरू करण्याचं वय हे चुकीचं आहे. दुसरा भाग म्हणजे मुलांना आपण काय आणि कसं शिकवतो ती सुधरायला हवीत. शिक्षण देण्याची साधनं अजून निर्माण झालेली नाहीत. काही ठिकाणी साधनं आहेत पण ती साधनं शिक्षक नीट वापरत नसल्यामुळं शिक्षणाचा प्रसार नीट होत नाही.प्रादेशिक भाषेतून शिक्षण घेतलेली मुलं जेव्हा इंग्रजी बोलतात तेव्हा त्यांच्या इंग्रजीला त्या प्रादेशिक भाषेचा हेल येतो. तेव्हा ते इंग्रजी प्रादेशिक भाषाच बोलतो आहोत, असं वाटतं हे टाळण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे ?अविनाश बिनीवाले - सुरुवातीला इंग्रजी भाषेवर आपल्या मातृभाषेचा, प्रदेशाचा परिणाम होणं स्वाभावीक आहे. पण तो टाळण्यासाठी काही एक्सरसाईज असतात. सुरुवातीला तीन एक्सरसाइज या फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे प्रोनन्‌सिएशन म्हणजे उच्चार. मुलांना शब्दांचा उच्चार शिकवण्याची गरज असते की जो आपल्याकडे नीट ठाकून, ठोकून शिकवला जात नाही. त्याकरता इंग्रजीमध्ये खूप साधनं उपलब्ध आहेत. भारतातही उपलब्ध आहेत. आज त्याच्या नुसत्या डिक्शनरीज नाही तर सीडीही उपलब्ध आहेत. पण आपण त्याचा नीट उपयोग करत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे शब्दांचा आघात. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटोनेशन. इंटोनेशन म्हणजे आवाजातला चढउतार. तो भाग फार महत्त्वाचा आहे. या तीन गोष्टींचा जर सराव केला तर आपल्याला नक्कीच इंग्रजी बोलणं जमणार. आता एक साधं उदाहरण घेऊ. इंग्रजीमध्ये कोणत्याही वाक्याच्या शेवटी 'ए' आला तर त्याचा उच्चार हा 'अं ' होतो, 'आ ' होत नाही. लोक अमेरिका SSS, कॅनडा SSS असं बोलून मोठा ' आ ' करतात. इंग्रजीमध्ये त्याचा उच्चार हा अमेरिकं, कॅनडं, चायनं असा होतो.तुमच्याकडे स्टुडन्टस् येतात ते एमबीए, कॅट अशा प्रकारच्या परीक्षा देणारे असतात. नंतर ते इंटरव्ह्यूमध्ये जातात, ग्रुप डिस्कर्शनमध्य्ये जातात. तिथल्या संभाषणासाठी मुलांनी कशाप्रकारे तयारी कारयची ?नरेंद्र वर्दे : जेव्हा स्टुडन्टसचे इंटरव्ह्यूमध्ये, ग्रुप डिस्कर्शनमध्ये इंग्रजी बोलतात तेव्हा ते त्यांचा मदर टंगचा टोन कॅरी फॉरवर्ड करतात. मदर टंगचा टोन निघून जाण्यासाठी आम्ही त्यांना निरनिराळ्या प्रकरच्या एक्सरसाईज देतो. ही साधारण वर्षभराची एक्सरसाईज असते. जी आम्ही त्यांना देतो. ज्यांना इंग्रजी नीट येतंय त्या मुलांना आम्ही सांगतो की रोजचा न्यूज पेपर मोठ्यानं वाचा. ते वाचताना आपल्याला आपला रिडिंग स्पीड कळतो. ज्यांचे प्रोनन्‌सिएशन चांगले नाहीत त्यांना ते सुधरायचे असतील तर बाजारात प्रोनन्‌सिएशन सुधारण्याच्या निरनिराळ्याप्रकारच्या कॅसेट मिळतात. एक डिफिकल्ट सेन्टेन्स घ्यायचा. तो प्ले करायचा. मग स्टॉप करायचा. चांगलं इंग्रजी येणं हे मॅटर ऑफ हार्डवर्क. त्यात शॉर्टकट नाही. इंटरव्ह्यूसाठी जेव्हा आम्ही मुलांना सेट करतो तेव्हा आम्ही सांगतो की, यू आर युवर बेस्ट जर्ज. इंटरव्ह्यूमधले बरेचसे प्रश्न हे सेट असतात. तुम्ही इंग्रजी बोलताना बॉडी लॅग्वेज ही महत्त्वाची असते.इंग्रजी हे बोलण्याच्या सरावातून सुधारतं. पण आजुबाजुला जर कोणीच इंग्रजी बोलणारं नसेल तर आपण आपलं इंग्रजी बोलणं कसं सुधारायचं ? इंग्रजी बोलण्याचे उच्चार कसे सुधारायचे ? बिनीवाले सर काही टीप्स देणार का ?अविनाश बिनीवाले - सर्वात आपण आपलं जेस्चर सुधारायचं, बॉडी लॅग्वेज सुधारयची. सोबत जर कुणी इंग्रजी बोलणारं नसेल तर दररोज एक पानभर इंग्रजी भाषेत लिहून काढावं.इंग्रजी बोलताना खूप जाणांना भीती वाटते. तर ती भीती काढून टाकण्यासाठी काय करावं ?अविनाश बिनीवाले - फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकताना विद्यार्थ्यांना निरनिराळी चित्रं दिली जातात. त्या चित्रांवरून मुलं लिहितात. आपण लिहितो केव्हा तर जेव्हा आपल्या डोक्यात एखादा विचार डेव्हलप होतो नेमकं तेव्हाच. निरनिराळी चित्र पाहून त्या चित्रांबद्दल इंग्रजीतून लिहिण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हाच निरनिराळ्या इंग्रजी शब्दांची आपल्याला तोंड ओळख होते. तुमचा रोजचा दिनक्रम इंग्रजीतून लिहिण्याचा प्रयत्न करा. नक्की इंग्रजी सुधारतं. तसंच बोलण्यातही आत्मविश्वास निर्माण होतो.मराठी माध्यमातल्या मुलांनी इंग्रजीची भीती कशी घालवली पाहिजे ?अविनाश बिनीवाले - त्यांनी इंग्रजी पुस्तकं वाचावीत. त्याने इंग्रजीतलं शब्दभंडार वाढतं. इंग्रजतली चांगली गाजलेली पुस्तकं साध्यासोप्या इंग्रजी भाषेत मिळतात. तीही वाचावीत.इंग्रजीचं ग्रामर सुधरायचे असेल तर चांगली रेफरन्स बुक्स कोणती ?अविनाश बिनीवाले - चांगला प्रश्न आहे. ग्रामर हा अतिशय कठीण विषय मानला जातो. पण प्रत्यक्षात तो गंमतीशीर विषय आहे. इंग्रजीचं ग्रामर सोपं आहे. आपल्या भाषेची जशी रचना आहे, तशी रचना इंग्रजीची असली पाहिजे, असा ब-याच जणांचा गैरसमज होतो. त्याने इंग्रजी सर्वात जास्त कठीण होऊन जातं. इंग्रजीत कधीच Today morning' Today evening असं कधीच म्हणत नाहीत. तर This Morning , This Evening असं म्हटलं जातं. Recently या शब्दाचा वापर इंग्रजीत कसा केला गेला, हेही लक्षात घेतलं पाहिजे. ते लक्षात घेतलं तर आपली भाषा आणि टार्गेट लँग्वेज यांच्यातलं अंतर दूर करता येईल. मराठीतले काळ आणि इंग्रजीतले काळ हे सारखे नाहीयत. तर त्यांचाही सराव केला पाहिजे. इंग्रजीतला प्रेझेन्ट पर फेक्ट कंटिन्युअस सारखा काळ हिंदी किंवा मराठीत असित्वात नाही.नरेंद्र तुमच्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा तुम्ही त्यांना न्यूज पेपरबरोबरीने काय वाचा असं सांगता ?नरेंद्र वर्दे : आम्ही त्यांना इंग्रजी पुस्तकं आणि न्यूज पेपर बरोबरीने बिझनेस स्टॅन्डर्ड आणि बिझनेस वीक हे देखील वाचायला सांगतो.इंग्रजी कसं सुधरायचं ? 1. उत्तम इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर जास्तीत जास्त इंग्रजी भाषेतील संभाषण ऐका. 2. इंग्लिश भाषेतील टी.व्ही प्रोग्रॅम , चित्रपट, पाहा आणि गाणी ऐका. 3. भाषा फक्त ऐकू नका तर ऐकलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या, त्या मागच्या भावना समजा. 4. इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करा शिकलेले नवे शब्द ,वाक्य परत परत बोला. 5. इंग्रजी भाषेत डायरी, ई-मेल लिहा. 6. शब्दांचं पाठांतर करू नका. 7. शब्दांच्या उच्चाराकडे लक्ष द्या 8. उत्तम इंग्लिश बोलणं म्हणजे व्याकरण बरोबर असणं नव्हे तर त्या मागचे सांस्कृतिक संदर्भ समजून बोलां इंग्लिश शिकण्यासाठी वेबसाईट * www.world-english.org * www.englishforums.com * www.world-english.org * www.tolearnenglish.com * www.zozanga.com * www.word2word.comhttp://sitemaker.umich.edu * http://sitemaker.umich.edu * www.englishpage.com * www.usingenglish.com * www.bbc.co.uk * www.bbc.co.uk/worldservice/learningenglish * www.learnenglish.org.uk * www.english-at-home.com

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2009 09:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2009 09:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close