S M L

कृषी उत्पन्न बाजार समितीची तोडफोड

26 ऑक्टोबरवाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार शेतकर्‍यांनी तोडफोड केली. सोयाबीनला मिळणारा कमी दर आणि मार्केटमध्ये असलेल्या असुविधांना कंटाळून शेतकरी संतप्त झाले. एपीएमसीच्या सभापती कार्यालयामध्ये ही तोडफोड करण्यात आली आहे. जाळपोळ करण्याचा प्रयत्नही शेतकर्‍यांनी केला. यावेळी शेतकर्‍यांनी पोलिसांच्या चार गाड्यांवर हल्ला केला आणि गाड्यांची तोडफोड केली. याआधी रास्ता रोको, निवेदनं या माध्यमातून शेतकर्‍यांनी प्रश्न मांडला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या या आदोलनाला हिंसक वळन प्राप्त झाले. यावेळी रिपोर्टिंगसाठी गेलेले आमचे आयबीएन लोकमतचे रिपोर्टर मनोज जैस्वाल यांनाही यावेळी पोलिसांनी मारहाण केली. त्यांचा कॅमेरा हिसकावला आणि 25 हजार रुपयेही हिसकावले. तहसीलदार आणि अधिकार्‍यांसमोर ही मारहाण झाली. आता याप्रकरणी वाशिम- जिल्हा पोलिस अधिक्षक महादेव तावडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2010 02:20 PM IST

कृषी उत्पन्न बाजार समितीची तोडफोड

26 ऑक्टोबर

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार शेतकर्‍यांनी तोडफोड केली. सोयाबीनला मिळणारा कमी दर आणि मार्केटमध्ये असलेल्या असुविधांना कंटाळून शेतकरी संतप्त झाले.

एपीएमसीच्या सभापती कार्यालयामध्ये ही तोडफोड करण्यात आली आहे.

जाळपोळ करण्याचा प्रयत्नही शेतकर्‍यांनी केला. यावेळी शेतकर्‍यांनी पोलिसांच्या चार गाड्यांवर हल्ला केला आणि गाड्यांची तोडफोड केली.

याआधी रास्ता रोको, निवेदनं या माध्यमातून शेतकर्‍यांनी प्रश्न मांडला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या या आदोलनाला हिंसक वळन प्राप्त झाले.

यावेळी रिपोर्टिंगसाठी गेलेले आमचे आयबीएन लोकमतचे रिपोर्टर मनोज जैस्वाल यांनाही यावेळी पोलिसांनी मारहाण केली.

त्यांचा कॅमेरा हिसकावला आणि 25 हजार रुपयेही हिसकावले. तहसीलदार आणि अधिकार्‍यांसमोर ही मारहाण झाली.

आता याप्रकरणी वाशिम- जिल्हा पोलिस अधिक्षक महादेव तावडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2010 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close