S M L

'भगवा दहशतवाद' शव्दास संघाचा कडाडून विरोध

10 नोव्हेंबरराजकीय हेतुनेच संघाची बदनामी करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज देशव्यापी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातही हे पुण्यात आणि नागपूरमध्ये आंदोलन झाले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धरणे आंदोलन केले. भगवा दहशतवाद हा शब्द वापरणं, हे राजकीय बदनामी करण्याचा हेतूने होत आहे. या गोष्टी थांबवण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. अजमेर बॉम्बस्फोटात संघाचे प्रचारक इंद्रेशकुमार यांचे नाव आल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे आंदोलन केले. नागपूरमध्ये सुद्धा संघाच्या मुख्यालयात आज धरणे आंदोलन करण्यात आले. यात सरसंघचालक मोहन भागवत तसेच संघाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या वतीनो देवेंद्र फडणवीस महापौर अर्चना डेहनकर उपस्थित होते. दरम्यान या धरणे प्रदर्शन दरम्यान काही काळ पोलीस आणि स्वयंसेवकामध्ये तणाव पाहायला मिळाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2010 03:24 PM IST

'भगवा दहशतवाद' शव्दास संघाचा कडाडून विरोध

10 नोव्हेंबर

राजकीय हेतुनेच संघाची बदनामी करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज देशव्यापी आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रातही हे पुण्यात आणि नागपूरमध्ये आंदोलन झाले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धरणे आंदोलन केले.

भगवा दहशतवाद हा शब्द वापरणं, हे राजकीय बदनामी करण्याचा हेतूने होत आहे. या गोष्टी थांबवण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.

अजमेर बॉम्बस्फोटात संघाचे प्रचारक इंद्रेशकुमार यांचे नाव आल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे आंदोलन केले. नागपूरमध्ये सुद्धा संघाच्या मुख्यालयात आज धरणे आंदोलन करण्यात आले.

यात सरसंघचालक मोहन भागवत तसेच संघाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या वतीनो देवेंद्र फडणवीस महापौर अर्चना डेहनकर उपस्थित होते.

दरम्यान या धरणे प्रदर्शन दरम्यान काही काळ पोलीस आणि स्वयंसेवकामध्ये तणाव पाहायला मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close