S M L

एशियन गेम्सना शुक्रवारपासून सुरुवात

11 नोव्हेंबरसोळाव्या एशियन गेम्सना उद्यापासून सुरुवात होत आहेत. भारतीय वेळेनुसार उद्या संध्याकाळी आठ वाजता स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे. चीनमधले गुआंगझाओ शहरही स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चीन सरकारने मागची चार वर्षं मेहनत घेतली. शहरात नवीन रेल्वे स्टेशन, जागोजागी नवे सब वे किंवा ओव्हरब्रिज उभारणे यासारखी कामं वर्षभर आधीच पूर्ण करण्यात आली. शिवाय बारा जागतिक दर्जाची स्टेडिअम उभारण्यात आली. गुआंगझाओ शहराची लोकसंख्या जवळपास एक कोटी आहे. नागरिकांमध्ये स्पर्धेविषयी कमालीची उत्सुकता आहे. शहराच्या मुख्य भागात ज्यांची घर आहेत त्यांना घरांचे नुतनीकरण करण्यासाठी चीन सरकारने प्रोत्साहन दिले. यंदा पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा स्टेडिअममध्ये न होता पर्ल नदीच्या काठावर होणार आहे. बारा नोव्हेंबर ते सत्तावीस असे सोळा दिवस ही स्पर्धा चालणार आहे. आणि 45 देशातले बारा हजार ऍथलीट्स यात सहभागी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 11:50 AM IST

एशियन गेम्सना शुक्रवारपासून सुरुवात

11 नोव्हेंबर

सोळाव्या एशियन गेम्सना उद्यापासून सुरुवात होत आहेत. भारतीय वेळेनुसार उद्या संध्याकाळी आठ वाजता स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे.

चीनमधले गुआंगझाओ शहरही स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चीन सरकारने मागची चार वर्षं मेहनत घेतली.

शहरात नवीन रेल्वे स्टेशन, जागोजागी नवे सब वे किंवा ओव्हरब्रिज उभारणे यासारखी कामं वर्षभर आधीच पूर्ण करण्यात आली.

शिवाय बारा जागतिक दर्जाची स्टेडिअम उभारण्यात आली. गुआंगझाओ शहराची लोकसंख्या जवळपास एक कोटी आहे.

नागरिकांमध्ये स्पर्धेविषयी कमालीची उत्सुकता आहे. शहराच्या मुख्य भागात ज्यांची घर आहेत त्यांना घरांचे नुतनीकरण करण्यासाठी चीन सरकारने प्रोत्साहन दिले.

यंदा पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा स्टेडिअममध्ये न होता पर्ल नदीच्या काठावर होणार आहे. बारा नोव्हेंबर ते सत्तावीस असे सोळा दिवस ही स्पर्धा चालणार आहे.

आणि 45 देशातले बारा हजार ऍथलीट्स यात सहभागी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close