S M L

मुंबई महापालिकेत काँगेसमध्ये फूट

12 डिसेंबर, मुंबईमुंबई महापालिकेत काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. नारायण राणेसमर्थक नऊ नगरसेवकांनी आपण वेगळा गट तयार करत असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसनं मात्र सध्या याकडे दुर्लक्ष करण्याचंच ठरवलंय. सुनील मोरे हे मध्य मुंबईतल्या नायगावचे नगरसेवक आहेत. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडुन आले. पण कट्टर राणे समर्थक असलेल्या सुनील मोरे यांनी महापालिकेतल्या इतर आठ नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी राणेसमर्थकांचा गट तयार केलाय. राणे सांगणार ती भूमिका घेणार असल्याचं सुनील मोरे यांनी स्पष्ट केलं. या बंडखोर नगरसेवकांमध्ये अंधेरीच्या नगरसेविका ज्योत्सना दिघे, नायगावचे नगरसेवक सुनील मोरे, गोवंडीचे शशिकांत पाटील, वडाळ्याच्या नगरसेविका प्रेसिला कदम, घाटकोपरचे नगरसेवक सुरेश गोलतकर, दादरच्या नगरसेविका शकुंतला माने, मानखुर्दचे नगरसेवक विठ्ठल लोकरे, गोवंडीचे नगरसेवक सुरेश पाटील आणि अंधेरीचे नगरसेवक जगदीश कुट्टी यांचा समावेश आहे.महापालिकेत काँग्रेसचे 79 नगरसेवक आहेत . फूट पडण्यासाठी हवेत 26 नगरसेवक. ते नसल्यामुळं पक्षाचा आदेश म्हणजे व्हीप पाळणं राणे समर्थक नगरसेवकांना गरजेचं आहे. नाहीतर पक्षांतर बंदी कायद्याखाली त्यांचं नगरसेवक पद जाऊ शकतं. त्यामुळेच राणेसमर्थक नगरसेवक काळजीपूर्वक पावलं उचलत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2008 07:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2008 07:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close