S M L

'आदर्श'ला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची नोटीस

12 नोव्हेंबरआदर्श सोसायटीचे बांधकाम अनधिकृत असल्याने ही बिल्डिंग का पाडण्यात येऊ नये अशाप्रकारची विचारणा करणारी नोटीस केंद्रीय पर्यावरण विभागाने आदर्श सोसाटीला बजावली. घोटाळ्याच्या वादात सापडलेल्या आदर्श सोसायटीवर कडक कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिले. रमेश यांनी सोसायटीला कारणे दाखवा नोटीस बजावली. आणि नियम धाब्यावर बसवून बांधलेली सोसायटी का पाडण्यात येऊ नये, अशी विचारणा ही केली. त्याचबरोबर देशातल्या कोणत्याच शहरातल्या बेकायदेशीर बांधकामाला अभय मिळणार नसल्याचा कडक इशारा त्यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2010 02:05 PM IST

'आदर्श'ला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची नोटीस

12 नोव्हेंबर

आदर्श सोसायटीचे बांधकाम अनधिकृत असल्याने ही बिल्डिंग का पाडण्यात येऊ नये अशाप्रकारची विचारणा करणारी नोटीस केंद्रीय पर्यावरण विभागाने आदर्श सोसाटीला बजावली.

घोटाळ्याच्या वादात सापडलेल्या आदर्श सोसायटीवर कडक कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिले. रमेश यांनी सोसायटीला कारणे दाखवा नोटीस बजावली.

आणि नियम धाब्यावर बसवून बांधलेली सोसायटी का पाडण्यात येऊ नये, अशी विचारणा ही केली.

त्याचबरोबर देशातल्या कोणत्याच शहरातल्या बेकायदेशीर बांधकामाला अभय मिळणार नसल्याचा कडक इशारा त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2010 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close