S M L

हुतात्मा बाबू गेनूचं घर राष्ट्रीय स्मारक होणार

श्रीरंग गायकवाड12 डिसेंबर, महाळुंगे पडवळ12 डिसेंबर. स्वातंत्र्यासाठी प्राण अपर्ण करणार्‍या हुतात्मा बाबू गेनू यांचा बलिदान दिवस. यानिमित्तानं आयबीएन-लोकमतनं हुतात्म्याच्या आठवणी जागवल्या.पुणे- नाशिक हायवे लगतच्या आंबेगाव तालुक्यातलं महाळुंगे हे बाबू गेनू यांचं गाव. देशासाठी प्राणत्याग करुन बाबू गेनू यांनी गावाचं नाव अजरामर केलंय. मुंबईत जाऊन गिरणीकामगार झालेले बाबू गेनू हे स्वदेशीच्या चळवळीत सहभागी झाले. 12 डिसेंबर 1930 रोजी काळबादेवी रोडवर परदेशी कपड्यांविरोधात निदर्शनं सुरू होती. यावेळी तरूण बाबू गेनू थेट परदेशी कपड्यांच्या ट्रकपुढे आडवे झाले. या थोर देशभक्ताचं सरकारनं गावात स्मारक उभारलं. पण गावाबाहेरचं बाबू गेनूचं घर मात्र उपेक्षितच राहिलं. या मोडकळीस आलेल्या घराचं आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. त्यासाठी दोन कोटींचा निधी जाहीर झालाय. शिवाय बाबू गेनूचं जन्मशताब्दी वर्षही धुमधडाक्यात साजरं होणार आहे. ' सरकारनं घर ताब्यात घेतलंय. इथं स्मारक उभारलं जाणार आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं तालुक्यातले तरुण मुंबईला मोटारसायकल रॅली घेऊन जाणार आहेत ', असं बाबू गेनू यांचे पुतणे मारुती सैद यांनी सांगितलं. यानिमित्तानं या वीराच्या बलिदानाच्या आठवणी जागवल्या जाणार आहेत. युवकांपुढं देशभक्तीचा आदर्श ठेवला जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2008 12:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2008 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close