S M L

अंध विद्यार्थ्यांनी साकारली चित्रं

12 डिसेंबर, मुंबईगोविंद तुपे एखादं सुंदर चित्र आपल्या समोर आहे. ते सुंदर चित्र अंधव्यक्तीनं रेखाटल्याचं कळल्यावर आश्चर्यचकीत व्हायला होतं. ही वस्तुस्थिती आहे. मुंबईच्या ताओ आर्ट गॅलरीत अंध विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. प्रदर्शनातली अश्विन वाघमारेची चित्र लक्षवेधी ठरली आहेत. अंध अश्विनने प्रदर्शनात साकारलेला निसर्ग पाहून भलेभले चाट पडतात. अश्विन वाघमारे ताडदेवच्या व्हिक्टोरिया स्मारक अंध शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे. " मी थोडासा लहान होता तेंव्हा माझ्या बाबांनी प्लॅस्टिकचे प्राणी, प्लॅस्टिकचा सूर्य आणून दिला होता. ते मी या ठिकाणी इमॅजिन करून चित्र काढली आहेत, '' अशी माहिती अश्विनने दिली. त्याला पेंटिंगबरोबरीनं गाण्याचीही आवड आहे. ' मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, ' हे अश्विनचं सर्वात आवडतं गाणं आहे. अश्विनने तेही गाणं म्हणून उपस्थितांची दाद मिळवली आहे. अश्विनसारख्या दीडशे मुलांनी काढलेली चित्रं वरळीतल्या ताऊ आर्ट गॅलरीत ठेवण्यात आली आहेत. या चित्रांची विक्रीही केली जात आहे. या चित्रांच्या विक्रीतून येणा-या रकमेपैकी ऐंशी टक्के रक्कम ही त्या मुलांना दिली जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजक श्रीराम मंडाळे सांगतात, " डायरेक्ट मुलांना पेपर दिला. त्यांना सांगितलं की जे काही तुमच्या मनात आहे ते ड्रॉ करा. जेव्हा मुलांनी त्यांची चित्र रेखाटली तेव्हा आम्ही थक्क झालो. या मुलांच्या सर्जनशीलतेला दाद द्यावीत अशी चित्र या मुलांनी रेखाटली आहेत." मी या मुलांची चित्र पाहून भारावून गेलो आहे, अशी प्रतिक्रिया गायक सुदेश भोसले यांनी व्यक्त केली आहे. ज्यांनी आयुष्यात फक्तआणि फक्त अंधारच पाहिलाये, आपल्या आजूबाजूच्या जगातल्या अनेक गोष्टी , इतकंच काय ज्यांनी स्वत:चा चेहरा ही पाहिला नाही. ज्यांच्या दृष्टीची कवाडं जन्मताच बंद झाली, अशा मुलांनी काढलेली ही चित्र त्यांच्या मनाची कवाडं उघडी असल्याची साक्ष देतात..

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2008 01:38 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2008 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close