S M L

बुलेट प्रूफ गाड्यांची मागणी वाढतेय

13 डिसेंबर, नवी दिल्ली मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशात जास्त सतर्कता जाणवतेय. त्यामुळेच अशा हल्ल्याच्या वेळी सुरक्षाव्यवस्थेचा एक पर्याय म्हणून बुलेट प्रूफ गाड्यांची मागणी देशभरातून वाढलीय. पंजाबमध्येअशा बुलेटप्रूफ गाड्या मोठ्या प्रमाणावर बनवल्या जातात, तिथंही उत्पादन वाढवण्यात आलंय. जालंधरमधील बुलेटप्रूफ गाड्या बनवण्याच्या कारखान्यात कधी नव्हे ते ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी इथल्या कामगारांवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. गेल्या वर्षी याच कारखान्यातून फक्त 12 गाड्या बाहेर पडल्या होत्या. पण यावर्षी या कारखान्याचा बिझनेस अगदी 100 टक्के झालाय. देशात अतिरेकी हल्ल्यांचं प्रमाण वाढल्यामुळे साहजिकच बुलेटप्रूफ गाड्यांची मागणी वाढलीय. ' खाजगी कंपन्यांमुळे आमचा बिझनेस चांगला चाललाय. लोकांना त्यांच्या गाड्यांची आणि जीवाची काळजी जास्त आहे. पूर्वी एका महिन्यात दहा ते बारा गाड्यांची ऑर्डर यायची, पण आता महिन्याला 20 ते 30 ऑर्डर्स येतील, असं वाटतंय. मागणी वाढेल ', असं लग्गार इंडस्ट्रीचे संचालक संचित सोबती यांनी सांगितलं.राजकारणी, उद्योगपती ते अगदी सिनेस्टार्सपर्यंत सर्वांनाच हवंय बुलेटप्रूफ कारचं मजबूत सुरक्षाकवच. त्यामुळे या वर्गाकडून मागणी जास्त होतेय. पण प्राणघातक हल्ल्यापासून वाचवणार्‍या या गाड्यांना बुलेटप्रूफ करणंही महागडं काम आहे. एका स्कॉर्पिओची किंमत 8 लाख रुपये आहे, तर 18 लाख रुपये मर्सिडिज बेंझ मोजावे लागतीलआणि टोयोटा लँड क्रूझर प्रादोसाठी वीस लाख रुपये द्यावे लागतील. बुलेटप्रूफ कार घेणार्‍या प्रत्येक ग्राहकाची सर्व माहिती नोंदवून घेतली जाते. देशात बहुतेक सर्वच उद्योग जागतिक मंदीच्या तडाख्यात सापडलेत. पण असं असताना पंजाबमध्ये मात्र बुलेटप्रूफ गाड्यांचा बिझनेस जोरात चाललाय आणि दुर्देवानं त्याला कारण दहशतवाद आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 01:21 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close