S M L

माय सन वाज बॉर्न सोल्जर - के. उन्नीकृष्णन

13 डिसेंबर, पुणे नितीन चौधरी ' माय सन वाज बॉर्न सोल्जर ... ' माझा मुलगा लढवय्या होता. हे उद्गार आहेत मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या वडिलांचे. मेजर संदीपच्या आई वडिलांनी पुण्यातील एनडीएला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या.आपल्या जिगरबाज कमांडो मुलाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी के. उन्नीकृष्णन आणि त्यांची पत्नी पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये आले होते. त्यांचा मुलगा मेजर संदीप उन्नीकृष्णननं इथेच लष्करी शिक्षण घेतलं आणि इथेच देशासाठी जान देण्याची शपथ घेतली. 'आठवीत असल्यापासून लष्करात जायचा निर्णय घेतला होता. मला त्याला इंजिनियर बनवायचं होतं. पण तो फिजिकल अ‍ॅक्टिव्हीटीमध्ये उत्तम होता. मला त्याचा खूप अभिमान वाटतो ', असं के. उन्नीकृष्ण यांनी सांगितलं. संदीपच्या बलिदानानं मला स्फूर्ती मिळालीय. मलाही सैन्यात भरती व्हायचंय, असं ते शेवटी म्हणाले. मेजर संदीपच्या काही वस्तू एनडीएच्या संग्रहालयातही ठेवण्याचा मानसही त्याच्या वडिलांनी बोलून दाखवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 02:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close