S M L
  • 'लोकपाल'चा मसुदा मराठीत आणणार - अण्णा हजारे

    Published On: Jun 25, 2011 05:31 PM IST | Updated On: Jun 25, 2011 05:31 PM IST

    25 जूनज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज आयबीएन-लोकमतच्या ऑफिसला भेट दिली. आणि लोकपालबद्दल त्यांनी लोकांच्या प्रश्नांना लाईव्ह उत्तरं दिली. त्यापूर्वी अण्णांनी आयबीएन-लोकमतच्या ऑफिसची पाहणी करून इथं चालणार्‍या कामकाजाची माहिती करून घेतली. लोकपालाचा मसुदा जनतेपर्यंत पोचवण्यासाठी सर्व प्रादेशिक भाषांमध्ये आणणार असल्याची घोषणा त्यांनी केली. लोकपालाबद्दल घेतल्या जाणार्‍या आक्षेपांना उत्तर देताना त्यांनी लोकपाल म्हणजे समांतर सरकार नसल्याचं स्पष्ट केलं. लोकपालाच्या मसुद्यावर सहमती निर्माण करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे अण्णांनी सांगितलं. लोकपाल विधेयकाच्या कक्षेत सर्वच अधिकार्‍यांचा समावेश केला तर सर्वसामान्यांचा खूप मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close