S M L

प्रशासकीय सुधार आयोगाचा रिपोर्ट जाहीर

13 डिसेंबर दिल्लीचांगलं काम केलं तर त्याचं बक्षिस मिळेल. नाही केलं तर घरी बसावं लागेल.हा संदेश आता सरकारी अधिका-यांना मिळणार आहे.अर्थात जर प्रशासकीय सुधार आयोगाची ही शिफारस मान्य झाली तर...ज्येष्ठ काँग्रेस नेते वीरप्पा मोईलींच्या नेतृत्वाखालील आयोगानं नुकताच असा रिपोर्ट सादर केला आहे.वर्षानुवर्षे सुटाबुटात राहून कामचुकवेगिरी करणा-या कर्मचा-यांना सरकारनं एक दणका दिला आहे. प्रशासकीय सुधार आयोगानं पहिल्यांदाच ब्युरोक्रसीवर रिपोर्ट जाहीर केलाय. त्यामध्ये कामचुकार कर्मचा-यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. नोकरीची 14 ते 20 वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचा-यांचा रेकॉर्डचा यात समावेश आहे. चांगलं काम करणा-या कर्मचा-यांच्या नोकरीची कालमर्यादा वाढवली जाईल.त्याशिवाय सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत जनरल कॅटेगरीसाठी वयाची अट 30 वरून 25 वर्ष करण्यात येणार आहे. कोणत्याही कर्मचा-यांना परदेशात पाठवण्याचा निर्णय आता सेन्ट्रल सिव्हिल सर्व्हिस ऑथॉरिटी करणार आहे. जॉईन्ट सेक्रेटरी आणि त्यांच्या वरच्या पोस्टसाठी पाच सदस्यांची सेन्ट्रल सिव्हिल सर्व्हिसेस ऑथॉरिटी बनवण्यात येणार असल्याची शिफारस आयोगानं केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 03:42 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close