S M L

मुंबईतले तबेले शहराबाहेर जाणार

14 डिसेंबर, मुंबईअलका धुपकरमुंबईमधले सतराशे तबेले शहराबाहेर हलवण्याविषयीचा नियोजित अंतिम आराखडा 18 डिसेंबरला सादर करण्याचे आदेश मुंबई हाय कोर्टानं उच्च न्यायालायाने सरकारला दिले आहेत. 'जनहित मंच' या एनजीओने 2005 साली यासंदर्भातली जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टानं नेमलेल्या दोन अ‍ॅडव्होकेटच्या समितीनं डहाणू मधली दापेचरी हीच जागा तबेले हलवण्यासाठी योग्य असल्याचा अहवाल दिलाय.मात्र तबेल्याच्या मालकांचा या स्थलांतराला विरोध आहे. आपल्याला योद्य मोबदला मिळेल का ? याची चिंता त्यांनी सतावतेय. "जर सरकारनं आम्हाला योग्य मोबदला दिला नाही, तर आम्हाला आमच्या म्हशींना कत्तलखान्यात पाठवण्याशिवाय पर्याय नाही. म्हशी घेऊन आम्ही कुठेही फिरू शकत नाही" असं तबालामालक मुस्तफा यानं सांगितलं.मुंबईतल्या तबेल्यांमध्ये 40 हजार म्हशी आहेत. या म्हशी आणि तबेल्यांमुळे प्रदूषण वाढतं, त्यामुळे तबेले शहराबाहेर हलवावेत, अशा नोटीसा प्रदूषण नियंत्रण मंडळानेही यापूर्वी तबेलेवाल्यांना दिल्या आहेत. डहाणू मधली दापेचरी जागा खरं तर राज्यसरकारने डेअरी उद्योगासाठी 1950 सालीच खरेदी केली आहे. पण तिथे तबेले बांधून दिल्याशिवाय स्थलांतर करणार नाही, अशी भूमिका तबेलेवाल्यांनी घेतली आहे. "तिथे फक्त जंगल आहे. रस्ते नाहीत, पाण्याची सोय नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. अशा परिस्थितीत आम्ही तिकडे जाऊ शकत नाही" अशी प्रतिक्रिया सी. के. सिंग या तबेलामालकानं दिली.मुंबईतले म्हशींचे तबेले मुंबईबाहेर जाणार हे तर निश्चित झालंय. फक्त त्यांना केव्हा हलवण्यात येणार याचा निर्णय आता हायकोर्ट देईल. हा आदेश आल्यानंतर तबेलामालक आणि सरकारमध्ये चांगलाच वाद रंगणार, हे ही आता स्पष्ट झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2008 07:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2008 07:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close