S M L

आठवण राज कपूरची...

14 डिसेंबर, मुंबईद ग्रेट शोमॅन राज कपूर यांचा आज जन्मदिन. या स्वप्नांच्या सौदागरानं प्रेक्षकांना क्लासिक सिनेमे दिले, ते अजरामर झाले. राज कपूर यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. आवारा हँू ... म्हणणार्‍या राज कपूर यांचं स्थान कायमचं रसिकांच्या मनात राहिलं. साध्यासुध्या क्लॅपर बॉयचा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.... असा मोठा प्रवास झाला आणि त्यांचे सिनेमे जगभरात लोकप्रिय झाले. राज कपूरच्या सिनेमानं प्रेम कसं करायचं ते शिकवलं.त्याबरोबर मानवतेचा संदेशही दिला. सिनेमा कुठलाही असला, तरी जगण्यातला आशावाद राज कपूर यांनी कायम ठेवला. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट जमान्या नंतर राज कपूर यांचे ' बॉबी ' आणि ' राम तेरी गंगा मैली हो गयी हे ' सिनेमेही खूप गाजले. पाच दशकं प्रत्येक पिढीला हा स्वप्नांचा सौदागर आपलाच वाटला. त्यांच्या जन्मदिनी आयबीएन लोकमतची त्यांना आदरांजली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2008 08:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2008 08:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close