S M L

'मारुती' ची पंचविशी

14 डिसेंबरभारतीय वाहनक्षेत्रात क्रांती घडवण्याचं श्रेय मारुती उद्योग लिमिटेड कंपनीला दिलं जातं, 'फॅमिली कार' ही संकल्पना भारताला अनोळखी असतानाच कंपनीनं त्यांची पहिली फॅमिली कार चौदा डिसेंबर 1983 रोजी मार्केटमध्ये आणली आणि ती होती मारुती एट हंड्रेड. पहिली मारुती एट हंड्रेड गुरगाव प्लान्टमध्ये तयार झाली होती. मार्केटमध्ये येताच काही वर्षातच मारुती 800 नं भारतीय रस्त्यांवर चांगलीच हुकुमत गाजवली. मारुतीच्या या प्रवासाला तब्बल पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. आज मारूती सुझुकीनं देशातल्या ऑटो इंडस्ट्रीत महत्वाचं स्थान मिळवलंय. आजपर्यंत कंपनीनं विविध प्रकारच्या बारा मॉडेल्सच्या सुमारे सत्तर लाख गाड्या विकल्या आहेत. पण यात मोठा वाटा मारुती एट हंड्रेडचा आहे, आतापर्यंत एकूण, सत्तावीस लाख छत्तीस हजार शेहचाळीस मारुती कार्स देशात विकल्या गेल्या आहेत. एका छोट्याशा पेटीसारख्या दिसणार्‍या या फॅमिली कारला टक्कर द्यायला लवकरच टाटा मोटर्सची नॅनो मार्केटमध्ये येईल. नॅनोमध्ये मारुतीपेक्षा एकवीस टक्के जास्त जागा असल्याचा दावा टाटा मोटर्सनं केलाय. वेगाच्या बाबतीत कोणती गाडी बाजी मारेल हे अजून स्पष्ट नाहीये. नुकतीच कंपनीनं मारूती एट हंड्रेड कारची किंमतही कमी केलीय,आता मारुती एट हंड्रेड सुमारे 1,86,968 रुपयात उपलब्ध आहे. एक काळ असा होता जेव्हा भारतीय मार्केटमध्ये आणि इथल्या रस्त्यांवर नवी गाडी उतरवणं हे एक आव्हान होतं आणि त्या काळात मारुती एट हंड्रेडनं हे आव्हान पेललं. देशात इतरही लक्झरी गाड्या आल्या. पुढल्या वर्षी स्वस्त म्हटली जाणारी नॅनोदेखील येईल पण रस्त्यावरुन धावणारी एखादी दिमाखदार लाल गाडी गेली की अजूनही डोळ्यांसमोर येते ती मारुती एट हंड्रेड .

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2008 10:38 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2008 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close