S M L

भारत निर्माण योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस

15 डिसेंबर लातूरपुरूषोत्तम भांगेलातूर जिल्हयातील भारत निर्माण योजनेअंतर्गत मोठया प्रमाणात बोगस कामं होत असल्याचं उघडकीस आलं आहे. ज्यांच्या नावावर जमीनच नाही, अशांच्या नावाने शेतात विहीर खोदून जिल्हा परिषदेच्या अधिका-यांनी सावळ्या गोंधळ घालण्याचा कळस गाठला आहे. लातूर जिल्ह्यातील कासारखेड्याच्या अनिल शिंदे यांनी माहितीच्या अधिकाराखाली भारत निर्माण योजनेअंतर्गत होतं असलेल्या कामाचा अहवाल जिल्हा परिषदेकडून मिळवला.या अहवालातील माहिती धक्कादायक असून ज्यांच्या नावे गावात जमीनच नाही, त्यांच्याच जमिनीवर विहीर खोदल्याचं स्पष्ट झालं आहे. भूवैज्ञानिकांनी माती परीक्षण केल्यानंतर विहीर पाडण्यासाठी परवानगी दिली जाते. कासारखेडयात भूवैज्ञानिकांनी अस्तित्वातच नसलेल्या जमिनीचं परीक्षण करून, ती जमीन विहीर खोदण्यासाठी योग्य असल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे. या जागेची पाहणी करण्याचं गाभीर्यही अधिका-यांनी दाखवलं नाही. त्यामुळे बाराही महीने दुष्काऴात जगणा-या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती चालूच आहे. कागदोपत्री खोदलेल्या या विहिरीसाठी चार महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते दहा लाखांचा धनादेशही संबधितांना देण्यात आला होता.तर उर्वरित 33 लाख 24 हजार रुपये मंजुरीच्या वाटेवर आहेत .

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2008 03:24 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2008 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close