S M L
  • पतंग उडवण्याची मजा, पक्षांना सजा

    Published On: Jan 15, 2012 11:44 AM IST | Updated On: Jan 15, 2012 11:44 AM IST

    शची मराठे, मुंबई15 जानेवारीसंक्रातीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात आणि याच पतंगाच्या मांजात अडकून मोठ्या प्रमाणावर पक्षीदेखील जखमी होतात. या जखमी पक्ष्यांना औषधोपचार करण्याचं काम करुणा ही संस्था करते.करुणाचा कार्यकर्ते मुकेश जयसूद यांनी आपल्या संसस्थेबद्दल माहिती देत असताना पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेली घार दाखवली. या मांजामुळे तिचा पाय गेला. याच मांजामुळे दरवर्षी संक्रातीला जवळपास 100-125 कावळे,चिमण्या,कबुतरं असे पक्षी जखमी होतात आणि करुणा या संस्थेत येतात.मनोज वाघोला म्हणतात, "रेस्क्यू टीम, करुणा ऍन्टिना, झाडं केबल इसमे बहुत बुरी तरहसे फसते है ये लोग"या जखमी पक्षांच्या मदतीसाठी करुणाच्या 8 ऍम्ब्युलन्स कायम तयार असतात. डॉ.शिरीष देशपांडे म्हणतात, ऍम्ब्युलन्समध्ये आल्यावर आम्ही त्यांना बेसिक उपचार करतो. 99 % ते इथंचं क्युअर होतात. पण जास्त सिरिअस असेल तर आम्ही त्याला परळला पाठवतो.या करुणाच्या टीमबरोबरीनचं खास संक्रांतीच्या दिवशी अनेक नागरिक सहभाग घेतात यात हिरा व्यापारी अश्विनभाई, बोरिवलीचे संकेत युवा मंडळ सहभागी होतात. डॉ.शिरीष देशपांडे यांनी मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत सर्वांना एकच विनंती केली, पतंग उडवताना साधा मांजा वापरा आणि जर एखादा पक्षी जखमी आढळला तर 9819 100 100 या हेल्प लाईनवर फोन करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close