S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • साठीनंतरही जुळताय 'लिव्ह इन'मुळे रेशीमगाठी !
  • साठीनंतरही जुळताय 'लिव्ह इन'मुळे रेशीमगाठी !

    Published On: Jan 24, 2012 12:08 PM IST | Updated On: Jan 24, 2012 12:08 PM IST

    प्रशांत कोरटकर, नागपूर24 जानेवारीतरूणांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप शब्द दिवसेंदिवस प्रचलित होत आहे पण वृध्दांचे लिव्ह इन रिलेशन असं ऐकल्यावर थोड दचकायला होईल पण ही संकल्पना नव्यानेच नागपुरात बघायला मिळते आहे यासाठी वृध्दांचे लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.वयाची सत्तरी पार केलेले नागपूरचे दीक्षित काका अनेक वर्षापासून एकाकी जीवन जगतायत...मुलं मोठी झाली, नोकरी ला लागली, आपापल्या कामात व्यस्त झाली..आणि भरल्या घरांतही दीक्षितकाकांना पोरकं वाटायला लागलं. त्यामुळे त्यांचे पाय आपसूकच वळले, ते वृध्दांच्या लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाकडे... सध्या अनेक तरूण जोडपी लग्नाशिवाय लिव्ह इन रिलेशिपमध्ये एकत्र राहत आहे. पण वयोवृध्दांच्या बाबतीत मात्र हा ट्रें़ड, तर गरज आहे. त्यामुळेच नागपुरातील काही वृध्द एकत्र आले आणि हे मंडळ स्थापन झालं. जोडीदार सोडून गेल्यावर एकटेपणा खायला उठतो. अशावेळी एखादा जिवलग जवळ असावा, जेणे करून उरलेलं आयुष्य आनंदात जावं हाच यामागचा उद्देश.. आता या नात्यांना समाज-मान्यतेबद्दल मतांतर आहेतच पण वृध्दापकाळात सहचर हवाच, असं तज्ञांनाही वाटतंय.सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भोपाळ, अहमदाबादमध्ये वृध्दांच्या लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची सुरूवात झाली. अर्थातच महाराष्ट्राकरताही हा अनोखा प्रयोग....! त्यामुळे उदासवाण्या सायंकाळींऐवजी, ढळला रे ढळला दिन सखया...संध्याछाया सुखविती हृदया असाही आशावादी सूर ऐकू येईल.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close