S M L
  • 2014 ची निवडणूक लढणार नाही - शरद पवार

    Published On: Jan 28, 2012 01:30 PM IST | Updated On: Jan 28, 2012 01:30 PM IST

    28 जानेवारी यानंतरची 2014 ची निवडणूक शरद पवार हे उमेदवार राहणार नाही, मी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत केली. मला संसदीय लोकशाही पध्दतीमध्ये लोकांमधून निवडून येऊन 45 वर्ष होत आहेत. गेली 45 वर्ष मी एका दिवसाचा ब्रेक न घेता काम करत आलो आता येणार्‍या नव्यापिढीला संधी दिली पाहिजे असं मत पवार यांनी व्यक्त केलं. दिल्ली ते महाराष्ट्र आणि राजकारण ते किक्रेट विश्वात आपल्या अनुभव आणि नेतृत्वामुळे वेगळा ठसा उमटवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार...शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे आज महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा रोवला गेला आहे. आज राज्यात महानगरपालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यानिमित्त आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत, निवडणुकीमध्ये जर काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि दुसर्‍याबाजूला भाजपाला पण बहुमत मिळाले नाही तर एनडी युपीए अस होण्याऐवजी काहीतरी तिसरी आघाडी होईल आणि त्याच्यामध्ये शरद पवार महत्वाची भूमिका बजावतील असं प्रत्येक निवडणुकीला चर्चा होते आणि याही निवडणुकीला यावर चर्चा होईल याबद्दल आपलं का मत आहे ? असा प्रश्न निखिल वागळे यांनी विचारला असता. यावर शरद पवार म्हणतात की, पुढच्या दहा पंधरा वर्षात लोकांना आवडो ना आवडो आघाडीच्या राजकारणाकडे दुर्लक्षित करता येणार नाही. पुर्वी आम्हा नेत्यांचे जे दिवस होते. एका पक्षाची शक्ती केंद्रापासून ते राज्यापर्यंत आणि संपूर्ण देशामध्ये राज्य अशी होती. आता हे दिवस संपलेले आहे. यापुढे जिल्ह्याचे,राज्याचे चित्र वेगळी वेगळी असणार आहे. दिल्लीतही एका पक्षाच्या पाठीमागे असणारी बहुमताची शक्ती कमी दिसत आहे. यामुळे दोनच पक्ष महत्त्वाचे राहणार आहे. एक ऑल इंडिया काँग्रेस पार्टी आणि दुसरी भाजप त्यामुळे पर्यायी सरकार बनणार असेल तर दोघांपैकी एकाला संख्याबळावर सत्ता स्थापन करता येणार आहे. आणि राहिला प्रश्न तिसर्‍या आघाडीचा तर मला स्वत:ला एक सांगावसे वाटते की, 2014 ची निवडणूक शरद पवार हे उमेदवार राहणार नाही, मी निवडणूक लढवणार नाही. मला संसदीय लोकशाही पध्दतीमध्ये लोकांमधून निवडून येऊन 45 वर्ष होत आहेत. गेली 45 वर्ष मी एका दिवसाचा ब्रेक न घेता काम करत आलो आता येणार्‍या नव्यापिढीला संधी दिली पाहिजे असं मत पवार यांनी व्यक्त केलं. तसेच मी निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडणार पण याचा अर्थ असा नाही की पक्षाचे काम जबाबदारी सोडत आहोत असं नाही मी फक्त निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे आणि नव्यापिढीला संधी दिली पाहिजे, त्याना प्रोत्साहन दिले पाहिजे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close