S M L
  • राणेंचे मानसिक संतुलन बिघडले - अजितदादा

    Published On: Feb 1, 2012 11:22 AM IST | Updated On: Feb 1, 2012 11:22 AM IST

    01 फेब्रुवारीनारायण राणे यांचे संतुलन बिघडले आहे अशी जहरी टीका अजित पवार यांनी नारायण राणेंवर केली. आपल्या मनाविरुध्द काहीही झालं की राणे नेहमीच बरळतात, राणेंकडे मी फार लक्ष देत नाही असं सुद्धा अजित पवार म्हणाले. काल कुडाळ येथे राणेंनी 'वस्त्रहरण'या सभेत अजित पवार आणि आर.आर पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज नगरमध्ये बोलताना अजित पवारांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, वैयक्तिक आरोप केले तर जशास तसं उत्तर मिळेल असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी नारायण राणेंची पाठराखण केली. उद्योगमंत्री नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. दोघांनीही एकमेकांचा यथेच्छ उद्धार केला. राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांच्या तोंडूनच राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे जाहीर वाभाडे निघत आहे. नारायण राणे यांनी अजित पवारांवर केलेल्या या घणाघाती आरोपांनी सरकारमधील दोन पक्षांमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पण पहिल्यांदाच.. एका कॅबिनेट मंत्र्याने दुस-या मंत्र्यावर एवढे गंभीर आरोप केलेत. राणेंच्या या टीकेला अजितदादांनी आणि गृहमंत्र्यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आक्रमक फोडाफोडीला काँग्रेसचे नेते आधीच वैतागले आहे. त्यामुळे एरवी राणेंनाच समज देणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी मात्र त्यांची पाठराखण केलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुरु असलेल्या चिखलफेकीमुळे विरोधकांना आनंद झाला नाही तरच नवलंच. सरकारमधील दोन पक्ष एकमेकांचं वस्त्रहरण करण्यात दंग आहेत. पण राज्यभरात कायदा सुव्यवस्थेचं वस्त्रहण होतंय, त्याकडे मात्र लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close