S M L
  • कृपाशंकर गेले कुठे ?

    Published On: Mar 1, 2012 06:10 PM IST | Updated On: Mar 1, 2012 06:10 PM IST

    01 मार्चकृपाशंकर सिंह यांचावर गुन्हे दाखल झाल्यापासून कृपा बेपत्ता झाले आहे. पण नेमके कृपा कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी आमचा सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकर यांनी कृपांच्या मुंबईतल्या घरांना भेटी दिल्या. पण बंगल्यावर सुरक्षारक्षका शिवाय कोणीच नव्हते मग कृपाशंकर आहे कुठे ? मुंबईप्रमाणेच कृपाशंकर यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आमचे रिपोर्टर त्यांच्या उत्तर प्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यातल्या गावातही पोहोचले. जौनपूर जिल्ह्यातल्या सहोदरपूर गावात कृपाशंकर वडिलोपार्जित घर आहे. याच घरात कृपाशंकर लहानाचे मोठे झाले. इथं कृपाशंकर यांचे भाऊ शोभनाथ सिंह राहतात.पण आता कृपाशंकर कुठे आहेत याची माहिती त्यांच्या कुटुंबीयानांही नाही. आपण जमीनदार असून गर्भश्रीमंत असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. कृपाशंकर यांच्यावरचे सर्व आरोप हे खोटे आणि राजकीय असल्याचा आरोपही त्यांच्या भावाने केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close