S M L
  • 'हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्रीची धाव !'

    Published On: Mar 12, 2012 06:12 PM IST | Updated On: Mar 12, 2012 06:12 PM IST

    आशिष जाधव, मुंबई12 मार्चदेशाचं उपपंतप्रधानपद भूषवणारे यशवंतराव चव्हाण हे दिल्ली गाजवणारे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते..! दिल्लीच्या राजकारणात यशवंतरावांचा तब्बल 22 वर्ष दबदबा राहिला. हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्रीची धाव...ही म्हणच तेव्हापासून पडली यातच सगळं काही आलं.निर्मितीनंतर पहिल्या 2 वर्षांतच महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर पोहोचलं. पण अशातच देशावर चीननं आक्रमण केलं. आणि यशवंतराव चव्हाणांना संरक्षणनमंत्री म्हणून दिल्लीला जावं लागलं. दिल्लीत यशवंतरावाचा राजकीय मुत्सद्दीपणा, प्रशासकीय कुशलता आणि खंबीर नेतृत्त्व याची प्रचीती सगळ्यांनाच.दिल्लीत असले, तरी राज्याच्या राजकारणाकडेही यशवंतारावाचं लक्ष होतं. त्यांनी बेरजेचं राजकारण केलं, पण ते सुध्दा राज्याच्या हितासाठी. किसान कामगार सभेचे यशवंतराव मोहिते, शेकापचे शंकरराव पाटील ,कम्युनिस्ट पक्षाचे भाऊ साहेव थोरात आणि अण्णासाहेब शिंदे या लोकनेत्यांना यशवंतरावांनीच काँग्रेसमध्ये आणले.दिल्लीतल्या सत्तासमीकरणामुळे यशवंतरावांना काही काळ इंदिरा गांधींची दु:स्वासहा सहन करावा लागला. त्यांना काँग्रेसच्या विरोधात सातार्‍यातून निवडणूक लढावी लागली.आणिबाणीनंतर देशात आणि काँग्रेसमध्येही बरीच उलथापालथ झाली. यशवंतराव इंदिरा गांधींच्या विरोधात गेले. आणि नंतर जुलै 1989मध्ये आलेल्या चौधरी चरणसिंग यांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान झाले. कृष्णाकाठच्या या कर्मयोग्याने दिल्लीचा यमुना तटही गाजवला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close