S M L
  • बसमध्ये हॉटेल..!!

    Published On: Apr 3, 2012 04:02 PM IST | Updated On: Apr 3, 2012 04:02 PM IST

    03 एप्रिल'हॉटेल ऑन व्हील्स' ही संकल्पना परदेशात खूपच लोकप्रिय आहे.. पण आता पिंपरी चिंचवडच्या स्वामिनी बचत गटाच्या महिलांनी असंच हॉटेल सुरू केलंय. डबल डेक्कर बसमध्ये बसण्याची मजा आणि हॉटेलिंगचाही आनंद मिळत असल्यामुळे दोनच दिवसांमध्ये हे मिल्स ऑन व्हील्स लोकप्रिय झालं आहे. विशेष म्हणजे जे हॉटेल बसमध्ये तयार झाले ती बस भंगारामध्ये काढण्यात आली होती. पीएमटी ही बस रस्त्यांवर वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापण्यासाठी वापरत असतं. मात्र पुण्यातून डबल डेक्कर बस हद्दपार झाल्यानंतर ही बसही भंगारात काढण्यात आली. नगरसेविका सुलभा उबाळे यांनी 'आयडिया कल्पना' सत्यात साकारुन तब्बल 14 महिन्याच्या मेहनतीनंतर हे बसमधलं हॉटेल सुरु केलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close