S M L
  • महापुरुषांच्या पंक्तीत अंडरवर्ल्ड डॉन

    Published On: Apr 11, 2012 04:34 PM IST | Updated On: Apr 11, 2012 04:34 PM IST

    11 एप्रिलज्या महापुरुषांमुळे देशाला सामर्थ्य,विकास, मोठा वारसा लाभला त्यांच्या पायाच्या धुळीची आजही कोणी बरोबरी करु शकणार नाही अशा महापुरुषांच्या पंक्तीत जर एखाद्या खंडणीखोर,डॉनचा फोटो पाह्याला मिळाला तर कोणाच्याही तळपायाची आग मस्तका पर्यंत पोहचले. पण असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई महापालिकेतल्या आरोग्य सभापतींच्या कार्यालयात हे दृश्यं पाहायला मिळलाय. आरोग्य सभापती गीता गवळी म्हणजे अरुण गवळीच्या कन्या यांच्याच कार्यालयात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या फोटोंच्या शेजारी चक्क अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा फोटो आहे. खंडणीसह अनेक गुन्ह्यांखाली अरुण गवळी सध्या तुरुंगात आहे. पण त्याचा फोटो मात्र महापुरुषांच्या पंक्तीत आहे. झालेला प्रकार पाहुन कोणाचे डोळे विस्फाटतील असा हा प्रकार घडल्यामुळे एकच पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close