S M L

मुंबई हल्ल्यानंतर जेएनपीटी प्रशासनाला जाग आली

16 डिसेंबर नवीमुंबईविनय म्हात्रे देशातलं सर्वात मोठं जेएनपीटी बंदर उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या. अनेकवेळा या बंदरातून शस्त्रसाठा मुंबईत आणला गेल्याचं उघडकीस आलं आहे. मात्र सुस्तावलेल्या जेएनपीटीच्या प्रशासनानं फक्त बैठका घेण्याशिवाय काहीच केलं नाही. 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर जेएनपीटी प्रशासन चांगलंच जागं झालं. नवीमुंबईच्या सागरी किना-यावर वसलेल्या जेएनपीटी बंदरात देशातील सर्वात जास्त 65 % कंटेनरची ये-जा होते. जेएनपीटीच्या तिन्ही बंदरात दरमहा तीन ते साडेतीन लाख कंटेनरची चढऊतार होते. या कंटेनरची तपासणी फक्त दोन स्कॅनिंग मशिनद्वारे होते. हे तपासणीचं प्रमाण केवळ 1 ते 2 टक्केच आहे. याच बंदरावर मुंबई क्राईम ब्रॅन्चने मोठा शस्त्रसाठा कंटेनरमधून जप्त केला होता. आता दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसाठा उतरवण्यासाठी सागरीमार्गाचा वापर केला. यामुळे जेएनपीटी व्यवस्थापनाने नुकतीच एक बैठक घेऊन जेएनपीटीच्या सुरक्षेबाबत व्यूहरचना आखली आहे.याबाबत नवी मुंबईचे पोलिस आयुक्त, रामराव वाघ सांगतात, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने बैठक झाली. या बैठकीत अनेक सूचना करण्यात आल्यात. त्यानुसार सुरक्षा यंत्रणा राबविण्यात येणार आहे.सुरक्षेसाठी आता जेएनपीटीमध्ये वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी टेहळणीसाठी समुद्रावर स्पॉटलाईट बसविण्यात येणार आहे. महाकाय कंटेनरच्या तपासणीसाठी आणखी 10 स्कॅनिंग मशिन आणल्या जाणार आहेत.26 नोव्हेबरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर आता सागरी सुरक्षा दल चांगलच सतर्क झालं आहे. यापूर्वीही अतिरेक्यांनी केलेल्या कारवाईनंतर अशाच प्रकारे इथलं प्रशासन सतर्क झालं होतं. पण ते फक्त काही दिवसासाठीच. आता पाहू या आणखीन किती दिवस हे प्रशासन सतर्क राहतंय ते. या समुद्राच्या चारही बाजूस जेएनपीटी,बीएआरसी, नेव्हीचं शस्त्रागार आणि ओएनजीसी अशी महत्त्वाची ठिकाणंआहेत. यामुळे या सागरी गस्तीचा आणि सुरक्षिततेच्या नव्या उपायांचा फायदा सर्वांनाच होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2008 07:47 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2008 07:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close