S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ठाणे पालिकेत सेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा राडा
  • ठाणे पालिकेत सेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा राडा

    Published On: Apr 20, 2012 11:15 AM IST | Updated On: Apr 20, 2012 11:15 AM IST

    20 एप्रिलठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीचा वाद आज महापालिकेच्या सभागृहात हाणामारीत उतरला.आज पालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांत जोरदार धक्काबुक्की झाली. तर बाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. तर बाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली... शिवसेनेच्या महापौरांनी राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे राष्ट्रवादी नाराज आहे. पण हा गोंधळ नेमका या नाराजीमुळे झाला. की त्यापलिकडेही काही स्थायी कारणं आहेत. असा प्रश्न उपस्थित होतोय. हा कुस्तीचा आखाडा नाही.. ही आहे ठाणे महापालिकेची महासभा. आणि हा राडा करणारे आहेत. ठाणेकरांनी निवडलेले नगरसेवक. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक नगरसेवक धिंगाणा घालताना ठाणेकरांनी पाहिले. संजय भोईर, नजीब मुल्ला, मुकूंद केणी, सुहास देसाई, विकास रेपाळे हे नगरसेवक एकमेकांशी अक्षरशः भिडलेले दिसतायत. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता महासभेत घुसला, असा आरोप शिवेसेनेने केला. तर राष्ट्रवादीनं हा आरोप फेटाळून लावलाय. शिवसेनेच्या महापौरांनी राष्ट्रवादीला डावलून.. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे खरं तर हा राडा झाला. या वादाला.. स्थायी समितीच्या निवडणुकीचीही पार्श्वभूमी आहे. कारण गदारोळातच.. स्थायी समितीच्या सदस्यांसाठी निवडणूक झाली. युती आणि आघाडीला सोळापैकी आठ आठ जागा मिळाल्या. पण समितीचं अध्यक्षपद सेनेच्या मदतीने मनसेला मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यातल्या प्रकारामुळे आघाडीतही ताण निर्माण झाला आहे. ठाण्यात दगा दिला, तर राज्यातल्या आघाडीबाबत काँग्रेसने विचार करावा असा सूचक इशारा प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिला. तर राष्ट्रवादीचे नेते आमच्या संपर्कात राहात नाहीत, आम्हाला गृहित धरतात, असा आरोप काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केला. ठाण्यातला राडा.. हा राज्यातल्या बदलत्या राजकीय संस्कृतीचं चित्र दाखवतो. हा स्थानिक प्रकार असला.. तरी दोन्ही पक्षातल्या प्रदेशाध्यक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यामुळे आघाडीतले ताणही लोकांसमोर आले आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close