S M L
  • सचिनला खासदारकी हा सन्मान -राज

    Published On: Apr 27, 2012 11:00 AM IST | Updated On: Apr 27, 2012 11:00 AM IST

    27 एप्रिलसचिन तेंडुलकरने खासदारकीकडे सन्मान म्हणून बघावं, राजकारण नाही. मुळात आज खासदारकीला लोकांनी इतकी बदनाम केली आहे की, त्यामुळे असं वाटतं खासदारकी घेणं योग्य आहे की नाही.पण सचिनने खासदारकी स्वीकारणे हा त्याचा प्रश्न आहे आणि त्याने तो घ्यावा अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.काल गुरूवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खासदारकी उमेदवारी देण्यात आली. सचिननेही खासदारकी स्वीकारली आहे. पण सचिनने खासदारकी स्वीकारण्यावरुन राजकारणाचे मैदान तापू लागले आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन चौफेर फटकेबाजी केली. मुळात खासदारकी घेणं ही चांगली गोष्ट आहे. एका अष्टपैलू व्यक्तीची खासदारकीसाठी शिफारस केली जाते याचा अर्थ असा नाही की तो त्या पक्षात सहभागी झाला.त्याचा काँग्रेसशी काही संबंध नाही. मध्यंतरी लतादीदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली मग काय दुसर्‍या दिवशी लतादीदी भाजपच्या प्रचाराला लागल्यात असं काही घडलं नाही. मुळात हा सचिनला दिलेला मोठा सन्मान आहे आणि त्याकडे सन्मान म्हणून पाहवं उगाचं राजकारण करु नये असं राज यांनी स्पष्ट केलं. तसेच ही माणसं खूप मोठी आहे त्यांनी देशाचा मान जगभरात उंचावला आहे. उगाचं कोणी त्याला लेबलं लावू नये. पद्म श्री, पद्मभूषण,पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार केंद्राकडूनच दिली जातात. त्यात कोणता पक्ष कधी आलाच नाही. मुळात कधी कधी कोणाचीही नावं दिली जातात आता अलीकडेच सैफ अली खानला पद्म पुरस्कार देण्यात आला. आता मला सांगा सैफने काय काम केलं नको त्या माणसाला असले पुरस्कार देता असा टोलाही राज यांनी लगावला. सचिन राज्यसभेत जाऊन काय भांडत बसणार असं काही होणार नाही. सचिनने क्रिकेटमध्ये इतकं मोठंदिलेल्या योगदानाबद्दल त्याचा हा सन्मान केला आहे आपण त्याकडे सन्मान म्हणून पाहावं असंही राज यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close