S M L

करकरेंचा मृत्यू संशयास्पद ?

17 डिसेंबरमुंबईवरच्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले हेमंत करकरे यांचा मृत्यू संशयास्पद आहे, असा आरोप करून केंद्रीय मंत्री ए.आर.अंतुले यांनी खळबळ उडवून दिली आहे. मुस्लिमेतर दहशतवाद शोधून त्याच्या मुळापर्यंत जाणारे करकरे हे एकमेव अधिकारी होते, त्यांच्यामुळेच नांदेड बॉम्बस्फोटाची फाईल पुन्हा उघडली, असं सांगायलाही अंतुले विसरले नाहीत.आधी असा आरोप करणार्‍या अंतुलेंनी नंतर लोकसभेत स्पष्टीकरण दिलं आणि करकरेंच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी केली. यावरून आज लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला. अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूविषयी शंका घेतली आहे."करकरे हे अतिशय बहादूर अधिकारी होते. देशहितापुढे त्यांना आपल्या प्रणांचीही पर्वा नव्हती. पण ताज किंवा ओबेरॉयमध्ये जाण्याऐवजी ते वेगळीकडेच कशाला गेले ?" असा सवाल अंतुले यांनी विचारला. अंतुलेंच्या या विधानामुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. पण अंतुलेंनी मात्र करकरे हे दहशतवादाच्या मुळाशी जाऊन तपास करणारे अधिकारी होते. त्यांच्यामुळंच नांदेड बॉम्बस्फोटाची फाईल पुन्हा उघडली गेली. त्यांनी मुस्लिमेतर दहशतवाद निपटून काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना गोळ्या लागल्याचं आपण पाहिलं. पण त्याही पलीकडे जाऊन त्याचं सत्य जाणून घेण्याची गरज आहे, असंही अंतुले म्हणाले.भाजपनं मात्र अंतुलेंच्या विधानावर संताप व्यक्त करत, आता पंतप्रधानांकडूनच स्पष्टीकरण मागितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2008 11:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2008 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close