S M L
  • मुजोर डॉ. मुंडेंचा पर्दाफाश

    Published On: May 28, 2012 04:48 PM IST | Updated On: May 28, 2012 04:48 PM IST

    28 मेबेकायदेशीरपणे गर्भपात करण्याचा गंभीर गुन्हा करुनही या डॉक्टरला कसलाच पश्चाताप नाही. बीडच्या सिव्हिल सर्जन डॉ. गौरी राठोड या डॉ. सुदाम मुंडेंचा जबाब नोंदवायला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हाची व्हिडिओ क्लीप आयबीएन लोकमतच्या हाती लागलीय. या क्लीपमध्ये सुदाम मुंडे यांचा जबाब नोंदवायला गेलेल्या डॉ. राठोड यांना बंद करुन ठेवलं होतं. डॉ. मुंडे यांच्याकडे गेलेल्या सर्वांना दरवाजा बंद करण्याच्या त्याच्या या दबावतंत्राचा अनुभव आलेला आहे. उलट मी फाशी घेऊ का, अशी धमकीच मुंडेंनी डॉक्टरांच्या टीमला दिली. एकीकडे चुकांची कबुली द्यायची, आणि दुसरीकडे हाच अरेरावीच्या भाषेत बोलत होता.तसेच स्त्रीभ्रूण हत्या करण्यात राज्यातला प्रमुख आरोपी असलेल्या डॉ. सुदाम मुंडे यांच्याकडे नर्सिंग होम चालवण्यासाठी आवश्यक असलेला बॉम्बे नर्सिंग होमचा परवानाच नाही. आणि स्वत: डॉक्टर मुंडेच याची कबुलीही दिली आहे. मुंडे यांच्याकडे बॉम्बे नर्सिंग होमचं रजिस्ट्रेशनच नाही. इतकच नाही तर बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठीच्या परवान्याचं रिन्यूवेशनही डॉ. मुंडेंनी केलेलं नाही.पण, या मुंडेंच्या केबिनमध्ये भिंतीवर सर्टिफिकेट लावण्यात आली आहेत. पण त्यातली अनेक सर्टिफिकेट ही रिन्यूवेशन न करता लावण्यात आलेली आहेत. डॉक्टरकीची डिग्री घेतलेल्या आणि 25 ते 30 वर्ष प्रॅक्टीस करणार्‍या या डॉक्टरला कोणताच नियम पाळण्याची गरज वाटली नाही. पैसे फेकतो आणि सर्टिफिकेट विकत घेतो, असाच त्याचा उद्दामपणा आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close