S M L

26/11च्या टॅक्सी चालकाच्या कुटुंबाला मिळाला न्याय

17 डिसेंबर मुंबईगोविंद तुपे मुंबई दहशतवादी हल्ल्यात विलेपार्ल्यात झालेल्या टॅक्सी बॉम्बस्फोटात मो.ओमर शेख ह्या टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला. मात्र त्या टॅक्सी चालकाच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही ही बातमी आयबीएन लोकमतने दिली होती. आणि याची त्वरित दखल राज्यसरकारने घेतली. सरकारच्यावतीने शेख कुटुंबाच्या मदतीसाठी 5 लाख रुपये आणि अत्यंविधीसाठी 15 हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला आहे.राज्य सरकारच्या या मदतीमुळे शेख कुटुंबाला आता मोठा आधार मिळाला आहे.मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लातअनेकांची कुटुंब उध्वस्त झाली. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् मुंबईत आले असताना त्यांनी सर्व पीडितांना 31 डिसेंबरच्या आत मदत द्या अशा सूचना अधिका-यांना दिल्या होत्या. पण विलेपार्ले येथील टॅक्सीत झालेल्या बॉम्बस्फोटात मृत झालेल्या मो.ओमर शेख या टॅक्सी चालकाच्या कुटुंबाकडे कुणाचही लक्ष गेलं नव्हतं. आयबीएन लोकमतने ही बाब सर्वप्रथम सरकारच्या आणि सर्वांसमोर आणली.मोमीन खान मुंबईतल्या गोवंडी भागात राहतात. 26 नोव्हेंबरला विलेपार्ल्यात टॅक्सीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांनी आपला नवरा गमावला. आणि आता अरबाज, फैजल, अफजल या तीन मुंलांच पोट कसं भरायचं हा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. मोमीन यांना सरकारी मदत मिळवण्यासाठी कुठे जावं लागतं, कोणती कागदपत्रं जमा करावी लागतात. हे माहीत नव्हतं. पण आयबीएन लोकमतच्या इम्पॅक्टमुळे मोमीन यांना मदत मिळाली. यांना आत्ता सरकारच्या वतीने 5 लाख आणि अत्यंविधीसाठी 15 हजाराचा धनादेश देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2008 05:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2008 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close