S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • जीवाची बाजी लावून राखली राष्ट्रध्वजाची शान
  • जीवाची बाजी लावून राखली राष्ट्रध्वजाची शान

    Published On: Jun 22, 2012 11:26 AM IST | Updated On: Jun 22, 2012 11:26 AM IST

    22 जूनमंत्रालयाच्या चौथ्या मजल्यात भीषण अग्नितांडव सुरु होते...धुराच्या लोटाने आसमंत झाकून गेले होते...कर्मचारी आपला जीव मुठीत धरून बाहेर पडत होते...पण मंत्रालयाच्या छतावर राष्ट्रध्वज उतरवण्यासाठी थांबलेल्या पाच जणांना पाहुन सगळेच जण स्तब्ध झाले... आदेशाची वाट पाहात बराच वेळ तसेच थांबले...नंतर राष्ट्रध्वज उतरवून खाली उतरले....जीवाची बाजी लावून राष्ट्रध्वजाची शान राखणार्‍या या पाच शुरविरांचे खाली आल्यावर टाळ्याच्या गजरात स्वागत करत त्यांच्या धाडसाला सलाम केला... राजेंद्र कानडे, गणेश मुंज, पंडित, दिपक अडसुळ, प्रेमजी रोज असे या कर्मचार्‍यांची नाव आहे. हे पाचही कर्मचारी चतृर्थ श्रेणी कर्मचारी आहे. राष्ट्रध्वज सुर्यास्ताच्या आधी खाली उतरवला जातो. पण अग्नितांडव सुरु असताना जीवाची परवा न करत हे फाईव्ह 'स्टार' छतावर चढले. ध्वज उतरवण्यासाठी आदेशाची वाट पाहिली, अखेर परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रध्वज खाली उतरवला आणि अग्निशमन दलाच्या स्ट्रेचरने खाली उतरले...अशा या शुरविरांना आयबीएन लोकमतचा सलाम...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close