S M L
  • मंत्रालयाची नवी इमारत बांधावी - पवार

    Published On: Jun 22, 2012 02:03 PM IST | Updated On: Jun 22, 2012 02:03 PM IST

    22 जूनराज्याच्या राजधानीत मुख्यप्रशासन इमारतीला लवकरच 50 वर्ष पूर्ण होतं आहे. पण काल मंत्रालयाला लागलेली आग दुर्देवी होती. सध्याची वास्तू भस्मसात झाली आहे. आता सरकारने स्वत:च्या हिंमतीवर नवी इमारत बांधावी असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला. मात्र, यासाठी सरकारने कोणाच्या कुबड्या घेऊ नये. कोणत्याही बिल्डर,कंत्राटदाराचा हात याला लागता कामा नये. आलेल्या अडचणीवर मात करत प्रशासन सक्रिय असल्याचा संदेश लोकांना द्यावा असंही पवार म्हणाले. शरद पवार यांनी आज मंत्रालयाची पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close