S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • उद्योगांवर बेकायदेशीर धाडी टाकणार्‍या कलमेचा पर्दाफाश
  • उद्योगांवर बेकायदेशीर धाडी टाकणार्‍या कलमेचा पर्दाफाश

    Published On: Jul 4, 2012 10:52 AM IST | Updated On: Jul 4, 2012 10:52 AM IST

    04 जुलैराज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी निर्माण केलेल्या पथकात.. मुश्रीफ यांचेच एक निकटवर्तीय बेकायदेशीरपणे राज्यातल्या कारखान्यांवर धाडी टाकत आहे. कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये गोळा करतायत, असा आरोप कामगार नेत्यांनी केला. कॅमेर्‍यासमोर गयावया करणारा हा माणूस.. एरव्ही बेकायदेशीरपणे कारखान्यांवर धाडी टाकून.. उद्योगपतींच्या नाकी नऊ आणतो. याच नाव आहे प्रवीण कलमे (वय 40 वर्ष), बेकार पण याची आहे राज्यातल्या उद्योगधंद्यांवर धाडी टाकणे.कामगारांच्या हक्कांचं रक्षण करण्याच्या उदात्त हेतूनं 2010 साली कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्हिजिलन्स पथक निर्माण केलं. या पथकाच्या सदस्यांबरोबर गेली तीन वर्ष प्रवीण कलमे राज्यभरात धाडी टाकतात. कलमेंचा सरकारशी काहीही संबंध नसताना, ते धाडी कसे टाकू शकतात. महत्त्वाच्या फाइल्सना हात कसे लावू शकतात.. या प्रश्नांची उत्तरं देताना पथकाच्या प्रमुख शशिकांत वैराट यांची बोबडी वळली.वैराट म्हणतात, फॅक्टरी ऍक्टमध्ये प्रोव्हिजन होत्या म्हणून गरज होती म्हणून घेतलं. म्हणजे तशी काही गरज नाहीय. कुतुहल होतं, म्हणून फाईल पाहायचे, मी त्यांना नंतर येऊ नका म्हणून सांगितलं.प्रवीण कलमेंचा पाठलाग आयबीएन लोकमतने केला. अखेरीस.. या पथकाशी आपला काहीही संबंध नाही आणि तरीही आपण पथकासोबत फिरतो अशी कबुलीच त्यांनी दिली. पण ही बातमीच प्रसिद्ध करु नये, अशी विनवणी करत त्यांनी आमिषही दाखवलं.कलमे म्हणतो, स्कॉडचं काय चाललंय ते वैराट आणि मंत्र्यांनाच विचारा पण ही बातमी प्रसिद्ध करु नका... माझ्यासाठी... माझ्या इंट्रेस्टसाठी...प्लीज ही बातमी प्रसिद्ध करू नका.कलमे यांच्या या धक्कादायक सल्ल्यानंतर त्यांना आजवर राजकीय कवचकुंडले कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बहाल केली का असा प्रश्न निर्माण होतोय.गेल्या तीन वर्षात या पथकानं किती ठिकाणी धाडी टाकल्या याची कसलीही नोंद सरकारकडे नाही. आवश्यक असलेला धाडीनंतरचा अहवाल या पथकानं सरकारला एकदाही दिला नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आलीय. तीन वर्षांत या पथकानं राज्यातील उद्योजकांना कायद्याचा धाक दाखवत कोट्यवधी रुपये जमवत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला. कामगार नेत्यांनी कलमेंच्या विरोधात तक्रारी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अनेकवेळा केल्या. पण प्रत्येकवेळी मंत्रीमहोदयांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली. कलमे हे मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आहेत असा आरोप कामगार नेत्यांनी केलाय. त्यामुळे आता हसन मुश्रीफ यांना अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. प्रवीण कलमेशी झालेला हा संवादरिपोर्टर - हे स्कॉड किती यशस्वी ठरलं तुम्हाला काय वाटतं?प्रवीण कलमे - मला वाटतं तुम्ही मंत्रिमहोदयांना आणि सेक्रेटरीला विचारलं तर अधिक योग्य ठरेल.प्रवीण कलमे - बरं मला एक सांगा...अगदी ओपनली बोलतो मी... तुम्हाला ही स्टोरी करायचीच आहे का? रिपोर्टर - हो का?प्रवीण कलमे - करायचीच आहे का?रिपोर्टर - हो करायचीच आहे.. तुम्ही नका करूरिपोर्टर - करू नको, का हो?आपल्या भागातल्या माणसाचा इंट्रेस्ट म्हणूनबाकी तुम्ही मला सांगा... आय एम विथ यू पण ही स्टोरी करू नका माझा इंट्रेस्ट म्हणून करू नका

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close