S M L
  • गँग्ज ऑफ चंद्रपूर

    Published On: Jul 5, 2012 04:27 PM IST | Updated On: Jul 5, 2012 04:27 PM IST

    प्रशांत कोरटकर,चंद्रपूर 05 जुलैचंद्रपूर जिल्हयात खाण माफियांचं वाढतं वर्चस्व कोळसा व्यवसायाला धोका निर्माण करणारं आहे. गेल्या काही दिवसात कोल माफीयांनी चार लोकांचा खून केला आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या घुग्गुसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षाची भर दिवसा तलवारीने हत्या करण्यात आली. कारण होतं. कोळशाच्या व्यवसायातलं शत्रुत्वाचं. हे कोळसा माफिया बेकायदेशीर तस्करी तर करतातच पण त्यांच्या कारनाम्यांमुळे गुन्हेगारीही वाढलीय. चंद्रपूर जिल्ह्यात 40 हजारांच्या वर अंडरग्राउंड आणि ओपनकास्ट खाणी आहेत. खाणीतला कोळसा नेताना यावर कोळसामाफियांची करडी नजर असते. या व्यवसायात अनेक गँग सक्रिय आहेत आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढलीय. लाखांची दलाली आणि प्रशासनाचं पाठबळ यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा माफियांनी उच्छाद मांडला आहे. या कोळसा माफियांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने सीआयएसएफसारखी यंत्रणा लावावी, अशी मागणीही झाली. पण सरकारनं त्याकडे फारसं गांभिर्याने बघितलं नाही. जो अधिकारी अशा माफियांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवतो त्या अधिकार्‍याची बदली करण्यात येते. त्यामुळे माफिया आणि प्रशासन यांचे साटेलोटे तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झालीय. चंद्रपूरमध्ये कोळसा खाणींवरुन होणार्‍या हिंसेचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलंय. एक नजर टाकूया या गँगवॉरवर...- हाजी सरवर आणि तिरुपती पॉल यांच्यातलं गँगवॉर नेहमीचंच- 2011 : कोल माफिया सत्याचा खून- 2011 : मनसे शहर अध्यक्ष नंदू सूर याचा खून - 6 महिन्यांपूर्वी घुग्गुस शहरात हाजी सरवरवर गोळीबार - 6 गोळ्या लागूनही हाजी सरवर बचावला- 4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा शहर अध्यक्ष तिरुपती पॉल याचा खून सिंधुदुर्गात कळणेमध्ये 600 कोटींपेक्षाही जास्त बेकायदा मायनिंगतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणे मायनिंगने लाखो टन बेकायदा लोहखनिज काढल्याचं निष्पन्न होऊन तब्बल सहा महिने झाले तरी अद्याप या मायनिंग कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही . नागपूर आणि कोल्हापूर खनिकर्म विभागाने नव्याने केलेल्या संयुक्त तपासणीत या मायनिंगमधून तब्बल 9 लाख टन बेकायदा लोहखनिजाचं बेकायदा उत्खनन झाल्याची माहिती आयबीन्एन लोकमतच्या हाती लागलीय. सुमारे 600 कोटीपेंक्षाही अधिकचा हा घोटाळा आहे. शिवाय सरकारचा कोट्यवधींचा महसूलही बुडाला आहे. मात्र राजकीय वरदहस्तामुळेच हे सगळं प्रकरण झाकलं जात असल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे. दरम्यान, कळणे मायनिंग बंद करा या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांसह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी अवैध खाणी बंद झाल्याच पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे पण पूर्ण खाण उद्योग बंद करता येणार नाही असं राज्यपालांनी या शिष्टमंडळाला सांगितलं. शिष्टमंडळात शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, परशुराम उपरकर, वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांचा समावेश होता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close