S M L
  • स्मशानातलं सोनं !

    Published On: Jul 18, 2012 02:46 PM IST | Updated On: Jul 18, 2012 02:46 PM IST

    18 जुलैदीप्ती राऊत, नाशिकलोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आज स्मृतीदिन. अण्णाभाऊंची शाहिरी सामाजिक परिवर्तनाची ललकारी ठरली. अण्णाभाऊंच्या मातंग समाजाच्या नावानं बर्‍याच घोषणा झाल्या, योजना आल्या... पण प्रत्यक्षात मातंग समाजाच आजही विकासापासून कोसो दूर आहे. म्हणूनच आजही पोट भरण्यासाठी स्मशाणातली राख शोधवी लागतेय. स्मशाण... इतरांसाठी शेवटचा मुक्काम... पण मातंगवाड्यातल्या जनाबाई, मीराबाई, लताबाईसाठी पोटाची खळगी भरण्याचं ठिकाण...धगधगणार्‍या चितेच्या सोबत त्यांच्या कामाला सुरुवात होते. विझलेल्या चितेखालची राख मीराबाई गोळा करते..जनाबाई मोठी कसरत करत स्मशाणभूमीतल्या भूमीगत पाईपात उतरते... वाहून गेलेल्या अस्थिंचा आणि राखेचा कण न कण जमा करतात..गंगेवर जाऊन चाळतात...घोळतात...आणि एवढा उपद्‌व्याप केल्यावर त्यांच्या हाती लागतं. 'तोंडातला मणी असला तर 100 रुपये मिळतात, कधी कागदासारखा तुकडा असतो त्याचे दिडशे मिळतात... ही चांदी आहे... हे जर्मन...' अंत्यविधीच्या वेळी मृतदेहाच्या तोंडात ठेवण्यात येणार्‍या सोन्याच्या मण्याची त्यांना आशा असते... प्रत्यक्षात कधी हाती लागते चांदी, कधी पितळ हल्ली तर बेन्टेक्सही.लताबाई साठे म्हणतात, कोण कसं मरेलं राहातं... डॉक्टर तोंडाला पदर लावून काम करतात... आम्ही असेच..तर आमचं कुत्र्याचं जीण. माणसाला इज्जल, पण आम्हाला नाही... कुत्र्यावाणी हुसकवतात आम्हाला असं जनाबाई डांगळे म्हणतात.जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जग बदलण्याचं स्वप्न पाहिलं. आज जग बदललं पण मातंग समाजाची स्थिती आजही बदललेली नाही. मातंग समाजातल्या महिलांना पोटाची आग विझवण्यासाठी जळणार्‍या चितेची राख थंड होण्याची वाट पाहावी लागतेय.दोर्‍या, टोपल्या, शिरया बनवण्याचा पारंपरिक केव्हाच मागे पडला आणि हा तेवढा उरला... आरक्षण आलं... महामंडळ स्थापन झालं. पण यांच्यापर्यंत काहीच पोहोचलं नाही.महामंडळाचा उद्देश सफल झाला नाही कारण कर्ज बँकेकडून मिळतं. तिथल्या अधिकार्‍यांची मानसिकता वेगळी असते.. मुख्य म्हणजे पुरावा... झोपडपट्टीत राहाण्याला कोण देणार कर्ज असा सवाल मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे उपस्थित करतात.शेवटी आजही चितेखालच्या अस्थींची राख गोळा करणं आणि त्यातून पोटाची भूक भागवणं हेच त्यांच्या वाट्याला..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close