S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही - प्रफुल्ल पटेल
  • आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही - प्रफुल्ल पटेल

    Published On: Jul 21, 2012 02:28 PM IST | Updated On: Jul 21, 2012 02:28 PM IST

    21 जुलैदिल्लीतल्या नाट्यमय घडामोडींनंतर आज राज्यातल्या राष्ट्रवादी नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी राज्यातल्या आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची तक्रार नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला डावललं जात असल्याचं म्हटलं. तर दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे काँग्रेसने विलासराव देशमुख,सुशिलकुमार शिंदेशी चर्चा करुन राज्यातील घडामोडींची माहिती घेतली.. दिल्लीतील काँग्रेसचे नेते महत्वाच्या नेत्यांसोबत संपर्कात असून घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आघाडी सरकारच्या समन्वय समितीची लवकरचं बैठक घेणार दोनही पक्षाच्या नेत्यांच्या तक्रारी ऐकून घेणार आहे. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांना या बैठकीबाबत पत्र लिहीणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close