S M L
  • पी ए संगमांनी केला पराभव मान्य

    Published On: Jul 22, 2012 01:46 PM IST | Updated On: Jul 22, 2012 01:46 PM IST

    22 जुलैदेशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल एनडीएचे उमेदवार पी.ए.संगमा यांनी प्रणव मुखर्जी यांचं अभिनंदन केलंय. पण त्यांनी मत मिळवण्यासाठी युपीएनं पॅकेजेस दिले ही गोष्ट चुकीची आहे असं संगमा यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर मी निवडणूक हरलो पण देशही आदिवासी राष्ट्रपतीला मुकला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रपती निवडणुकीत संगमांचा दारुण पराभव झाला. काहीठिकाणी एनडीएने साथ दिली तर काही ठिकाणी हात आखडता घेतला. पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन संगमा राष्ट्रपती निवडणुकीसाठी मैदानात उतरले. एनडीएने शेवटी शेवटीला संगमा यांना आपला पाठिंबा जाहिर केला. एका आदिवासी उमेदवाराला मतदान करावे असा प्रचार संगमांनी केला. त्यांना याची जाणीव होती की प्रणवदांना मोठा पाठिंबा आहे. त्यांचा विजय होऊ शकेल आणि एनडीए ऐनवेळी आक्रमक भूमिका घेऊन निवडणुकीत काहीतरी चमत्कार घडेल अशी अपेक्षा होती मात्र असं काही झालं नाही. संगमा यांना 206 संसद सदस्यांनी मतदान केले त्याचे मुल्य 2,39,966 इतके होते. तर प्रणव मुखर्जी यांना 5,58,000 मतं मिळाली आहे. संगमांनी आपला पराभव मान्य केला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close