S M L
  • आर.आर.पाटील अपयशी - राज ठाकरे

    Published On: Aug 13, 2012 03:31 PM IST | Updated On: Aug 13, 2012 03:31 PM IST

    13 ऑगस्टमावळ येथे आंदोलन झाले तेव्हा पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश मिळतात. मग शनिवारी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी हेच गृहखाते शेपटू घालुन का बसले होते ? महिला पोलिसांवर त्यांनी हात उचलला तरी सुध्दा गृहखाते नांग्या टाकून गप्प होते. हा सगळा प्रकार मतांसाठीच आहे गृहमंत्री पळपुटे आहे, आर.आर.पाटील अपयशी ठरले आहे अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. शनिवारी झालेल्या हिंसाचारावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत गृहखात्यावर कडाडून बरसले. आम्ही जेव्हा टोल नाका,मराठी पाट्या साठी आंदोलन केली तेव्हा गृहखाते पोलिसांना आदेश देऊन ठेवता यांचे आंदोलन मोडुन टाका,आंदोलकांवर तडीपारी लावा. मावळ येथे शेतकर्‍यांनी आंदोलन केले तेव्हांही पोलिसांना लाठीचार्ज, गोळीबार करण्याचा आदेश दिला. आंदोलकांवर दरोडेखोरांच्या खटले भरले. पण शनिवारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका जमावाने हिंसाचार केला तेव्हा गृहखाते काय शेपटा घालुन बसले होते का ? ऐन सनासुदीच्या काळात मोर्चाला परवानगी कशी दिली जाते ? हा सगळा पुर्वनियोजित कट होता. याचे नियोजन सुरु असताना यांच्या गुप्तचर यंत्रणेला काहीच कुणकुण कशी लागली नाही. आणि हे सगळे घडल्यानंतर संयम बाळगा, शांतता बाळगा असं सांगतात. हा सगळा प्रकार मतांसाठी आहे अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच ज्या माणसांनी हा हिंसाचार केला ती परराज्यातील होती. जर महाराष्ट्रातील ही लोक असती तर त्यांची हिंमत झाली नसती त्यांनी महिला पोलिसांवर हात उचलला नसता असंही राज यांनी सुनावले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close