S M L
  • देशमुख कुटुंबियांचं सांत्वन

    Published On: Aug 15, 2012 10:40 AM IST | Updated On: Aug 15, 2012 10:40 AM IST

    15 ऑगस्ट माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. त्यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी लातूरात मोठ्या संख्याने लोक उपस्थित आहे. येणार्‍यांना भेटण्यासाठी विलासरावांचे कुटुंबीय, पत्नी वैशालीताई, अमित, रितेश आणि धीरज देशमुख उपस्थित आहेत. काही वेळापुर्वीच पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पोहचल्या आहे. देशमुख कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं. सर्वपक्षीय नेत्यांनी विलासरावांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बाभळगावात आले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, माणिकराव ठाकरे,आर.आर.पाटील,गोपीनाथ मुंडे यांच्या आमदार,खासदार विलासरावांना श्रध्दांजली वाहिली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नीसह आणि कार्यकर्त्यांसह बाभळगावला पोचले. त्यांनी विलासरावांचं अंत्यदर्शन घेतलं आणि कुटुंबियांचीही भेट घेतली. बॉलिवूडच्या कलाकारांनी अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली आहे. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लातूरकर जड पावलांनी बाभळगावच्या परिसरात आलेत. यावेळी अनेकांना अश्रू अणावरण झाले नाही. आमचा नेता गेला अशी हळहळ व्यक्त करत अनेकांनी अश्रूना मार्ग मोकळा करुन दिला. लाडक्या नेत्याना निरोप घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं लोक हजर आहे. थोड्याच वेळ्यात विलासरावांची अंत्ययात्रा निघणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close