S M L
  • ईद मुबारक, हो !

    Published On: Aug 20, 2012 11:30 AM IST | Updated On: Aug 20, 2012 11:30 AM IST

    माधव सावरगावे, औरंगाबाद20 ऑगस्टदेशभर आज ईद साजरी होतेय. महिनाभर रोजा केल्यानंतर आज एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याचा दिवस...पहाटे नमाज पठण करून मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.मुस्लिम बांधवाच्या पवित्र महिन्याची शब-ए-कद्र ही रात्र संपल्यानंतर साजरी होते ईद..मुस्लिम बांधव हा संपूर्ण महिना रोजा म्हणजेच उपवास धरतात. आणि परंपरेनुसार आज ईद साजरी केली जाते. महिनाभर रोजे ठेवल्यानंतर ईदच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. एकमेकांना आलिंगण देत खाण्यासाठी हमखास शिरखुर्मा दिला जातो. शिरखुर्म्याबरोबर आता नवनवीन पदार्थही देण्यात येतात. नवीन कपडे, वेगवेगळे स्वादिष्ट खाद्य पदार्थ, आप्तेष्टांच्या भेटी, अशी आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे ईद... तुम्हालाही ईद मुबारक...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close