S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • आबा,थोडी तरी लाज उरली असेल तर राजीनामा द्या- राज
  • आबा,थोडी तरी लाज उरली असेल तर राजीनामा द्या- राज

    Published On: Aug 21, 2012 12:19 PM IST | Updated On: Aug 21, 2012 12:19 PM IST

    21 ऑगस्ट11 ऑगस्टला झालेल्या हिंसाचाराला बांग्लादेश,उत्तरप्रदेशहून लोक आली होती. पटनायकांच्या समोर महिला पोलिसांवर हात उचलला तरी सुध्दा पोलीस आयुक्त गप्प बसले होते. पण अशा कोणत्याही आंदोलनात पोलिसांवर हात उचलला तर तो खपवून घेणार नाही. जर एवढं सगळं होऊन सुध्दा आर.आर.पाटील आणि अरुप पटनायक यांनी थोडीशी तरी लाज उरली असेल तर स्वत:हून राजीनामा द्यावा अशी मागणी पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी केली. तसेच माझा मोर्चा हा हिंदुत्वाचा भाग नाही माझा एकच धर्म आहे तो म्हणजे महाराष्ट्रधर्म असं राज यांनी ठणकावून सांगितलं. राज यांनी पोलिसांची आणि माध्यमांवर झालेल्या हल्ल्याविरोधात हा मोर्चा होता असंही स्पष्ट केलं. महाराष्ट्रात यापुढे कोणताही असा प्रकार घडला तर पोलिसांवर हात उचलता कामा नये. पोलिसांवर हात टाकणार्‍या कुठल्याही धर्माचा असेल त्याला फोडून काढायला हवा. माझा मोर्चा निघाला तेव्हा मी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मोर्चा काढला असा आरोप केला जात होता पण माझा आणि माझ्या पक्षाचा एकच धर्म आहे तो फक्त महाराष्ट्रधर्म..या महाराष्ट्रासाठी वाटेल ते करु पण अत्याचार सहन केला जाणार नाही. सीसएसटी हिंसाचार झाल्यानंतर आज आठवडा उलटला गृहमंत्री आर.आर.पाटील आणि पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांना थोडी तरी लाज उरली असेल त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा अशी मागणीही राज यांनी केली. या भाषणानंतर विशेष बाब म्हणजे एका पोलीस हवालदाराने राज यांना स्टेजवर जाऊन फुल दिलं. आमच्यासाठी कोणीतरी बोलणार आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close