S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मुंबईत ऑईल रिफायनरीजवर अतिरेकी हल्ल्याचं सावट
  • मुंबईत ऑईल रिफायनरीजवर अतिरेकी हल्ल्याचं सावट

    Published On: Sep 6, 2012 04:43 PM IST | Updated On: Sep 6, 2012 04:43 PM IST

    शोएब अहमद, मुंबई06 सप्टेंबरकर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून नुकतीच 18 संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली. यानंतर देशातल्या अणु प्रकल्पांची सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबईतल्या भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच बीएआरसी (BARC)ची सुरक्षाही वाढवण्यात आली. पण त्याचबरोबर मुंबईतल्या ऑईल रिफायनरीजची सुरक्षाही खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलीय. अतिशय संवेदनशील समजल्या जाणार्‍या मुंबई शहरातल्या बीएआरसी आणि ऑईल रिफायनरीजला अतिरेक्यांकडून धोका असल्याचा स्पष्ट इशारा गुप्तचर विभागाने दिल्याची माहिती आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे.मुंबईचा पूर्वेकडचा पट्टा अतिशय संवेदनशील समजला जातो. या भागात भाभा अणुसंशोधक केंद्र आणि त्यालगत देशाला इंधन पुरवठा करणार्‍या एपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) या ऑईल रिफायनरीज आहेत. पण आता त्यांना धोका निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या राज्यात पसरलेलं अतिरेक्यांचं जाळं पोलिसांनी नुकतंच उद्धवस्त केलं. त्यानंतर BARC ला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. आता मुंबईतल्या रिफायनरीज सुद्धा अतिरेक्यांचं लक्ष्य ठरू शकतात, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला. ऑईल रिफायनरीजला धोका!- हल्ल्याचा कट रचणार्‍या अतिरेक्यांची संख्या, त्यांची पद्धत आणि ज्या ठिकाणावरून हा हल्ला करण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती गुप्तचर विभागानं आपल्या इशार्‍यात दिली आहे या ऑईल रिफायनरीजमध्ये एका वेळी 20 लाख किलो लीटर इतका पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि इतर इंधनाचा साठा असतो.700 एकरवर पसरलेल्या या परिसरात 200 मोठे इंधन साठे आहेत. इथे स्फोट झाला तर तब्बल 2 किलोमीटरचा परिसर पूर्णपणे उद्‌ध्वस्त होईल, असं तज्ज्ञ सांगतात.रिफायनरीजचं महत्त्व- या रिफायनरीज आर्थिकदृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असल्यानं अतिरेक्यांनी आता यांच्याकडे लक्ष वळवलंय. मुंबईतल्या या दोन रिफायनरीज उद्धवस्त झाल्या तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या सर्व राज्याचा इंधन पुरवठा ठप्प होऊ शकतो- यामुळे सरकारचं शेकडो कोटींचं नुकसान होईलगुप्तचर विभागाने दिलेल्या इशार्‍यानंतर या ऑईल रिफायनरीजची सुरक्षा वाढवण्यात आलीय. पण तरीही त्यात काही त्रुटी आहेत.ऑईल रिफायनरीज किती सुरक्षित ?- गुप्तचर विभागाच्या इशार्‍यानंतर रिफायनरीजजवळच्या 57 निवासी इमारती रिकाम्या करण्यात आल्या- BARC ची सुरक्षा CISF आणि DAE या दोन सुरक्षा यंत्रणांच्या हाती असल्यानं समन्वयाचा अभाव- गेल्या जुलैमध्ये करण्यात आलेल्या मॉक ड्रीलमध्ये BARCजवळच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आणि टाटा पॉवर प्लान्टमध्ये अतिरेकी किती सहजपणे घुसू शकतात, हे उघड झालंययापूर्वी मे मध्ये आणि आता पुन्हा एकदा गुप्तचर विभागाने अतिरेकी हल्ल्याच्या कटाबाबत अतिशय स्पष्ट माहिती दिलीय. त्यामुळे या महत्त्वाच्या संस्थांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलीय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close