S M L
  • असीमची सुटका

    Published On: Sep 12, 2012 11:25 AM IST | Updated On: Sep 12, 2012 11:25 AM IST

    12 सप्टेंबरव्यंगचित्रकार असीम त्रिवेदीची अखेर 3 दिवसांनंतर जामिनावर सुटका झाली आहे. दुपारी एकच्या सुमारास असीम जेलबाहेर येताच इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी असीमचं जोरदार स्वागत केलं. व्यंगचित्र काढून राष्ट्रीय मानचिन्हांचा अपमान केल्याचा आरोप ठेवून असीमवर देशद्रोहाच्या खटला भरण्यात आलाय. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. जोपर्यंत देशद्रोहाचा आरोप मागे घेतला जात नाही, तोपर्यंत जामिनासाठी अपील करणार नसल्याची भूमिका असीमने घेतली होती. पण एक जनहित याचिकेला प्रतिसाद देत कोर्टानेच असीमला जामीन देऊ केला. त्यानंतर आज त्याची सुटका झाली. त्याच्याविरोधात लावण्यात आलेला देशद्रोहाच खटला मागे घेतला जाईल अशी माहिती राज्य सरकारच्या सूत्रांनी दिली. जेलमधून बाहेर पडल्यानंतर असीमने जवळच्या बुद्धविहारात जाऊन घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close