S M L

' गजनी 'ची 90 कोटींची कमाई

18 डिसेंबर, मुंबई ' गजनी ' हिट व्हावा यासाठी आमिरचं जोरदार मार्केटिंगही सुरू आहे. पण सिनेमा रिलिज व्हायच्या आधीच गजनीने कमाई करून ठेवली आहे. एकीकडे थिएटर मिळवण्यासाठी अनेक सिनेमांना झगडावं लागत असतानाच ' गजनी ' चे थिएटर राईट्स तब्बल 40 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. स्टुडिओ 18 या डिस्ट्रिब्युशन कंपनीने हे राईट्स विकत घेतले आहेत. बाजारात मात्र ' गजनी 'ने रिलिज होण्याआधीच 90 कोटींची कामाई केल्याचं सांगितलं जात आहे. सिनेमा रिलीज झाला की प्रत्येक निर्मात्याला चिंता असते ती सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवरच्या कमाईची. 'गजनी' बाबत मात्र थोडं वेगळंच घडतंय. रिलीजची तारीख 25 डिसेंबर असली तरी सिनेमा आधीच 'अमीर' झाला आहे. मंदीमुळे आणि मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा प्रतिकूल परिणाम बॉक्स ऑफिसवर झालेला आहे. शाहरुखच्या ' रब ने बना दी जोडी 'ने चांगला बिझनेस केला असला तरी त्याला सुपरहिट यश मिळू शकलेलं नाही. काहीशा याच संमिश्र वातावरणात आमिरचा ' गजनी ' रिलीज होत आहे. ' गजनी ' हिट व्हावा यासाठी आमिरचं जोरदार मार्केटिंगही सुरू आहे. पण खरं तर रिलीज व्हायच्या आधीच गजनीने कमाई करून ठेवली आहे. स्टुडिओ 18 या डिस्ट्रिब्युशन कंपनीने ' गजनी 'चे राईट्स 40 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. ' गजनी ' चे सॅटेलाईट राईट्ससुध्दा स्टुडियो 18 नेच विकत घेतले आहेत. सॅटेलाइ राईटकरता स्टुडियो 18 नन या कंपनीने मोजलेत तब्बल 20 कोटी. थिएटर राईट्स आणि सॅटेलाईट राईट्ससाठी स्टुडिओ 18 ने 60 कोटी रुपयांचं बिग डील केलं आहे.आमिरच्या सिनेमांचं परदेशातलं रेकॉर्ड खूप चांगलं आहे. ' लगान ', ' रंग दे बसंती ', ' तारे जमीन पर ' सारख्या सिनेमांनी परदेशातही चांगला व्यवसाय केला होता. त्यामुळेच 'गजनी'चे ओव्हरसीज राईट्स-10 कोटी रुपयांना विकले गेलेत. बिग पिक्चर्सने हे राईट्स विकत घेतलेत.याशिवाय होम व्हिडिओ आणि ऑडिओ राईट्स टी सिरीजने विकत घेतलेत, अर्थात हा सौदा किती रुपयांना झालाय हे समजू शकलेलं नाही..पण एकंदरीत रिलीजआधीच गजनीने तब्बल नव्वद कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगितलं जातंय. आता तुमच्या लक्षात आलं असेलच आमिरला मिस्टर परफेक्ट का म्हणतात ते...

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2008 01:22 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2008 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close